प्रशांत दीक्षित यांना 'दिव्य'तून नारळ !

बेरक्याचे भाकीत खरे ठरले आहे. दिव्य मराठीचे स्टेट एडिटर प्रशांत दीक्षित यांना नारळ देण्यात आला आहे. दीक्षित यांची जागा नवनीत गुज्जर यांनी घेतली आहे. दरम्यान दीक्षित हे लोकमतच्या पुणे आवृत्तीत संपादक म्हणून जॉईन होणार आहे. यापूर्वीचे संपादक विजय बाविस्कर यांना समूह संपादक म्हणून पदोन्नती मिळणार आहे. पुढील वर्षी दिनकर रायकर सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची जागा बाविस्कर घेणार आहेत.

ऑक्टोबर मध्ये प्रशांत दीक्षित पुण्याच्या संपादकपदाची सूत्रे घेताच, बाविस्कर वरळी मुक्कामी बस्तान हलवतील, असे समजते.सध्याचे समूह संपादक दिनकर रायकर लवकरच निवृत्त होत आहेत. तोवर बाविस्कर हे उप समूह संपादक म्हणून मुंबईत रायकर यांच्याकडून 'धडे' घेतील. रायकरांना सल्लागार संपादक किंवा संचालक केले जाण्याची शक्यता आहे.