पद्मश्रीच्या पेपरमध्ये हमरीतुमरी

पुणे - पद्मश्रीच्या पेपरमध्ये परवा चीफ रिपोर्टर आणि एका रिपोर्टरची हमरीतुमरी  झाली. त्याने चक्क चार-चौघात सुनावले, कुठून काय धंदे करून आलात साऱ्या जगाला माहिती आहे, उगाच शहाणपणा शिकवू नका... तुम्ही आणि तुमच्या चोरट्या टोळीचा लुटारू मुखिया पेपरचे वाटटोळे करील, 'सबका बंधू' आणि गिऱ्हाईक धुंडू असे तो म्हणाला. रिपोर्टरने इतिहासाची पाने चाळताच 'चीप'ची चड्डी पिवळी झाली होती.

नवीन कार्यकारी संपादक दाखल झाल्यापासून गटबाजी वाढली आहे.  एक प्रकरण दाबल्याप्रकणी पद्मश्रीनी चार चौघात खरडपट्टी करूनही काही झालेच नाही असा आव आणून पुन्हा खाबुगिरी सुरु आहे.