औरंगाबाद
- आपल्या फेसबुक वॉलवर ब्राम्हण महिलाबद्दल अश्लील, वादग्रस्त आणि
आक्षेपार्ह कविता पोस्ट करणाऱ्या सुरेश पाटील याची दिव्य मराठीतून
हकालपट्टी करण्यात आली आहे.
दिव्य मराठीने
आपल्या अंकात तसे निवेदन प्रसिद्ध केले आहे.सुरेश पाटील याने फेसबुकवर जे
लिहिले ती वैयक्तिक टिपण्णी होती, त्याचा दिव्य मराठीशी संबंध नाही, मात्र
त्याच्या या कृतीमुळे दिव्य मराठीची हानी झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान
सुरेश पाटील यांच्यावर औरंगाबाद आणि सेलू मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल होताच सुरेश पाटील फरार झाला आहे.