मुंबई -
अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर
गैरवर्तणुकीचे आरोप केल्यानंतर बॉलिवूडमध्ये एकप्रकारे #MeToo मोहिमेला
सुरुवात झाली आहे.त्याचे लोन आता मीडियातही पसरले आहे. महिला पत्रकार नीता
कोल्हाटकर यांनी, एका ज्येष्ठ पत्रकारावर गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे.
काही वर्षांपूर्वी कॅबमधून जात असताना एका ज्येष्ठ संपादकाने आपणास जबरदस्तीने जवळ ओढून चुंबन घेण्याचा प्रयत्न केला पण मी त्याला दूर ढकलले , त्यांची मला आजही घृणा वाटते असे ट्विट नीता
कोल्हाटकर
यांनी केले आहे. या
ट्विट नंतर मीडियात एकच खळबळ उडाली आहे.
हा पत्रकार नेमका कोण आहे हे
ट्विट
मध्ये लिहिले नसले तरी प्रकाश अकोलकर यांना त्यांनी टॅग केलं आहे. त्यामुळे अकोलकर यांच्यावर संशयाची सुई व्यक्त केली जात आहे.
A Marathi senior editor wt whom I was travelling in a cab yrs ago, while I sat in a corner, grabbed my face to try & kiss. I pushed him away. But left me disgusted @nashikar— NeetaKolhatkar (@neetakolhatkar) October 6, 2018
या
ट्विट नंतर प्रकाश अकोलकर यांनी प्रेस क्लबचा राजीनामा दिला आहे.
To
The President,
The Chairman and The Secretary,
The Mumbai Press Club,
Mumbai.
This
is to submit my resignation of the Membership of the Managing Committee
of the Club. This is also an opportunity for me to express my deep
gratitude towards the office bearers and my colleagues in the committee
for the last ten years.
I am also thankful to the staff for the cooperation they have given to me.
Thanks and regards,
Prakash Akolkar
Mumbai. October 7th, 2018