मुंबई
- 'राहा एक पाऊल पुढे" म्हणणाऱ्या झी 24 तास न्यूज चॅनलच्या युट्यूब
आयडीला कॉपीराईटचा दणका बसला आहे, त्यामुळे गेली दोन आठवडे झाले झी २४
तासच्या कोणत्याही बातम्या युट्युब वर अपलोड झालेल्या नाहीत.
सन
2013 मध्ये झी 24 तासने एका बातमीला बॅकग्राऊंडला म्युझिक वापरले होते, या
म्युझिकचे हक्क एका कंपनीकडे होते, त्यांनी युट्यूबकडे कॉपीराईटची तक्रार
केली असता, झी 24 तासने त्याकडे दुर्लक्ष केले होते, त्यानंतर या म्युझिक
कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला होता, त्यामुळे जवळपास 20 लाख सबक्राईब
असलेल्या झी 24 तासचा आयडी युट्युबने बॅन केला आहे.परिणामी गेल्या दोन
आठवड्यापासून झी 24 तासच्या युट्युब आयडीवर कोणत्याही बातम्या अपलोड
झालेल्या नाहीत.
आजकाल लोक न्यूज चॅनल कमी आणि
युट्युबवरील व्हिडीओ जास्त पाहतात, त्यामुळे झी 24 तासला मोठा फटका बसला
आहे. यापूर्वी असाच फटका एबीपी माझा, टीव्ही 9 ला बसला होता. झी
24 तास ही झी मीडियाचे चॅनल आहे. झी मीडिया म्हणजे ब्रँड, आमचे कोणी काही
करू शकत नाही, या भ्रमात वागणाऱ्या झी मीडियाला चांगलीच अद्दल घडली आहे.
संबंधित
कंपनीने कॉपीराईट क्लेम वापस घेण्यासाठी करोडो रूपयाची मागणी केल्याचे
समजते, हा समझोता होणार की सदर आयडी कायम बंद पडणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.