उमेश कुमावत न्यूज १८ लोकमतच्या वाटेवर

मुंबई - एबीपी न्यूज चे महाराष्ट्र ब्युरो उमेश कुमावत लवकरच न्यूज १८ लोकमतमध्ये सल्लागार संपादक म्हणून जॉईन होणार आहेत. कुमावत जॉईन झाल्यानंतर मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांची विकेट पडणार, हे निश्चित आहे.

मोठमोठ्या बाता मारून डॉ. उदय निरगुडकर हे  न्यूज १८ लोकमतमध्ये १२/१२/१७ रोजी जॉइन झाले.होते.मात्र एक वर्ष झाले तरी न्यूज १८ लोकमत आहे तिथेच आहे. चॅनल पाचव्या  क्रमांकावर आहे. ते गेल्या वर्षभरात एक ते तीन सोडा, चौथ्या क्रमांकावर कधी आले नाही. मध्यंतरी शरद पवार   यांच्याशी घेतलेला पंगा देखील अंगलट आला आहे. त्यामुळे मॅनेजमेंटने पुन्हा कॅप्टन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

चॅनल हेड आणि सल्लागार संपादक म्हणून म्हणून उमेश कुमावत दि. १२ नोव्हेंबर रोजी जॉईन होणार आहेत. त्यानंतर डिसेंबर अखेर डॉ.  डॉ. उदय निरगुडकर यांची अखेर होणार आहे. दरम्यान कुमावत यांनी  एबीपी न्यूचा रीतसर राजीनामा दिला असून त्यांची तिसरी टर्म संपणार आहे.