रघुनाथ पांडे यांचा पुण्य नगरीस रामराम

नागपूर - पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे संपादक  रघुनाथ पांडे यांनी पुण्य नगरीस राम राम ठोकला आहे. ते औरंगाबाद येथून सुरु होणाऱ्या एका चॅनलला संपादक म्हणून जॉईन झाले आहेत. पांडे यांच्या जागी कुणाची निवड होणार ?याकडे लक्ष वेधले आहे.

बाळ कुलकर्णी आणि अविनाश दुधे यांनी राजीनामा दिल्यानंतर रघुनाथ पांडे यांची संपादक म्हणून नियुक्ती झाली होती. पांडे यांनी पुण्यनगरीस राम राम ठोकून औरंगाबाद येथून नव्याने सुरु होणाऱ्या AM न्यूज चॅनलला संपादक म्हणून जॉईन झाल्याने  युनिट हेड रमेश कुलकर्णी आता संपादक म्हणून कुणाची शिफारस करणार याकडे लक्ष वेधले आहे.