औरंगाबाद
 - सकाळ माध्यम समूहातून बाहेर पडल्यानंतर संजय आवटे दिव्य मराठीच्या 
वाटेवर आहेत. सध्या त्यांची भोपाळमध्ये ट्रेनिंग सुरु असून, १ 
जानेवारीपासून दिव्य मराठीच्या 
औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे हाती घेतील. आवटे आल्यानंतर  
निवासी संपादक दीपक पटवे यांची विकेट पडण्याची शक्यता आहे. 
 सन 1999  मध्ये सोलापूरच्या दैनिक संचारमध्ये वृत्तसंपादक म्हणून पत्रकारितेस 
सुरुवात करणाऱ्या संजय आवटे यांनी, नंतर लोकमत (अकोला), लोकसत्ता (पुणे ), 
पुढारी (पुणे),  कृषीवल ( अलिबाग ) , पुन्हा पुढारी ( पुणे ), सकाळ ( मुंबई
 ) , साम ( मुंबई ) असा प्रवास करून भोपाळशेठच्या दिव्य मराठीत जॉईन होत 
आहेत. 
मागील महिन्यापासून आवटे यांची 
भोपाळमध्ये 
ट्रेनिंग 
 सुरु आहे. 
ट्रेनिंग पूर्ण होताच आवटे १ जानेवारीपासून 
औरंगाबाद आवृत्तीच्या संपादक पदाची सूत्रे हाती घेतील, मात्र त्यांच्याकडे 
स्टेट एडिटर चार्ज नसेल, असे सांगितले जात आहे. आवटे यांची कामगिरी बघून 
भोपाळशेठ पुढील निर्णय घेतील, असे सांगितले जात आहे. आवटे जॉईन झाल्यानंतर 
 निवासी संपादक दीपक पटवे यांची विकेटपडणार, हे निश्चित आहे. 
अभिलाष खांडेकर गेल्यानंतर स्टेट एडिटरची सूत्रे 
प्रशांत दीक्षित यांच्याकडे आली होती. मात्र दीक्षित लोकमत ( पुणे ) मध्ये 
जॉईन झाल्यानंतर कोणाची वर्णी लागणार ? याकडे लक्ष वेधले होते. अखेर आवटे 
यांनी, ही खुर्ची पकडली आहे. 
