चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर


औरंगाबाद - अप्रतिम मीडिया फाऊंडेशच्या वतीने देणारे  चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार-2019  जाहीर करण्यात आले आहेत. संचालक डॉ.अनिल फळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार विजेते

निर्मिती, व्यवस्थापन व संपादन गट
श्री.भास्कर लोंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी -संपादक, दैनिक लोकशाही वार्ता, नागपूर
श्रीमती सुचेता फुले, कार्पोरेट ट्रेनर  मेंटॉर फिल्म मेकिंग, प्रोड्युसर, संपादिका, इ-चित्रवेध, दुबई

बिट जर्नालिझम गट
ग्रामविकास - श्री. प्रबोध देशपांडे, अकोला (लोकसत्ता)
शुभ वर्तमान - श्री. संदिप शिंदे, माढा, जि.सोलापूर (दिव्य मराठी)
शैक्षणिक - श्री. वेदांत नेब, मुंबई (एबीपी माझा),

श्री. जालिंदर नन्नावरे, शिरुर-कासार, जि.बीड (दैनिक पुढारी)
सामाजिक - कु. प्रियंका बोबडे-धारवाले, नवी मुंबई (गांव माझा, यु ट्यूब चॅनेल)

श्री. संतोष भोसले, गेवराई, जि. बीड (दैनिक सामना)
श्री. दिलीप पोहनेरकर, जालना (इटिव्ही भारत)
श्री. रमेश भोसले, औरंगाबाद (लोकमत)
मनिषा इंगळे, अहमदनगर (रेडिओ)
सहकार - श्री. अशोक तुपे, श्रीरामपूर (लोकसत्ता)
पर्यावरण - श्री. सुमेद शाह, पापरी, जि. सोलापूर (दैनिक दिव्य मराठी)
पर्यटन - श्री. चंद्रकांत तारु, पैठण, जि. औरंगाबाद (दैनिक सकाळ)
गुन्हेगारी वार्ता - श्री. नितीन मोरे, औरंगाबाद (मुे पत्रकार)

श्री.स्वप्निल शिंदे, आसनगांव, ता. कोरेगांव, सातारा (लोकमत)
श्री. रमेश लांजेवार, नागपूर (मुे पत्रकार)

स्थानिक स्वराज्य संस्था
- श्री. संतोष देशमुख, औरंगाबाद, (दिव्य मराठी)
स्थानिक राजकारण - श्री. सोहेल कादरी, सिल्लोड, (आदर्श गांवकरी)
आर्थिक - अतुल होनकळसे, कराड  
छायांकन - श्री. शाम पलाये, छायाचित्रकार, औरंगाबाद
ग्रामीण वार्तांकन  गट -
श्री. शामकुमार पुरे, सिल्लोड (दैनिक लोकमत)
श्री. सूर्यकांत भिसे
श्री. सिद्धेश्‍वर गिरी, सोनपेठ, जि.लातूर

विशेषांक प्रकाशन गट
- श्री.सूरज लोकारे, श्‍वेता जोशी (माय पेपर), पुणे
श्री.प्रभाकर भोसले (थिंक पॉझिटिव्ह), पुणे
श्री.राम शेवडीकर, उद्याचा मराठवाडा, नांदेड

सोशल मीडिया विशेष - श्री. अविशांत कुमकर, बीड
फ्रिलान्स बिझनेस जर्नालिझम -
श्री.अभिजीत हिरप, क्रिएटिव्ह हब, औरंगाबाद
उत्तेजनार्थ - मीडिया एज्युकेशन - शुभम पेडामकर, मुंबई

एक दिवशीय कार्यशाळा
 दि. युनिसेफ, वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि अप्रतिम मीडिया फाऊंडेशनच्या शाश्‍वत विकासाचे ध्येय आणि प्रसारमाध्यमांचे कार्य या विषयावर लवकरच एक दिवसीय राज्यस्तरिय कार्यशाळा घेतली जाणार आहे, अशी माहिती संयोजक डॉ.दिनकर माने, विभागप्रमुख, वृत्तपत्रविद्या विभाग व डॉ.अनिल फळे, संचालक, अप्रतिम मीडिया फाऊंडेशन यांनी दिली.
वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचे पत्रकार अहोरात्र विकास समस्यांचा पाठपुरावा करत असतात. शाश्‍वत विकासाची ध्येये व उद्दिष्ट्ये लक्षात घेऊन सर्व माध्यम प्रकारातील पत्रकारांकडून कोणत्या अपेक्षा आहेत? तसेच केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून राबविले जाणारे धोरण व अंमलबजावणी या व इतर बाबींची कार्यशाळेत वस्तुनिष्ठ चर्चा होणार आहे. अनेक प्रकारच्या संस्था शाश्‍वत विकास कार्यामध्ये योगदान देतात. त्यापैकी काही संस्थांचे पदाधिकारी, विकास तज्ज्ञांबरोबर खुली चर्चा होईल. सावित्रीबाई फुले एकात्म महिला समाज मंडळ, दिलासा जनविकास प्रतिष्ठान,इकोलॉजिकल फाऊंडेशन, रामकृष्ण मिशन, भारत विकास ग्रुप व इतर काही संस्थांचा सहभाग असणार आहे.
ही कार्यशाळा ग्रामीण-शहरी वार्ताहरांपासून ते संपादकपदापयरतचे पत्रकार, विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी पत्रकार, सिटिझन जर्नालिस्ट तसेच नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेप्रसंगी पर्यावरण ते राजकारण अशा विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण पत्रकारिता करणार्‍यापत्रकारांना अप्रतिम मीडियाच्यावतीने चौथास्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार-2019 देऊन गौरविण्यात येणारआहे.