टीव्ही 9 ग्रुपच्या हिंदी चॅनलचं नाव - टीव्ही 9 भारतवर्ष !

मुंबई:  टीव्ही 9 ग्रुपचं लवकरच ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ हे हिंदी चॅनल लाँच करण्यात येत आहे. आओ देश बदलें अशी टॅगलाईन घेवून येत्या मार्च महिन्यात हे चॅनल प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होईल. सध्या टीव्ही 9 ग्रुपचे टीव्ही 9 मराठी, तेलुगु, कन्नड, गुजरातीसह विविध भाषांमधील न्यूज चॅनल आहेत. त्यामध्ये आता ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या राष्ट्रीय वृत्तवाहिनीची अर्थात नॅशनल न्यूज चॅनल्सची भर पडणार आहे.

‘टीव्ही 9 भारतवर्ष’ या हिंदी न्यूज चॅनेलसाठी देशातील सर्वात मोठा न्यूज स्टुडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये AR आणि VR या नव्या तंत्रज्ञानासह, प्रस्तुतीकरण आणखी उत्तम करण्यासाठी 'बीओटी न्यूज रॅकर’ (BOT News Tracker) चा वापर करण्यात येणार आहे.‘टीव्ही 9 भारतवर्ष’ हे फ्री टू एअर चॅनल असेल. त्यामुळे हे चॅनल सर्वत्र मोफत पाहता येईल. याशिवाय चॅनल जगभरात केबल, डीटीएचसह डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहता येईल.