मुंबई
: थोडक्यात न्यूज पोर्टलचे संपादक कृष्णा
वर्पे
यांना धमक्या दाखवून त्यांच्या पत्नीविषयी सोशल
मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या तीन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी
पक्षाकडून नोटीस पाठवून यासंबधी जाब विचारला जाईल, अशी माहिती खासदार
सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
मोहसीन
शेख, महादेव बालगुडे आणि सचिन कुंभार अशी या तिन्ही राष्ट्रवादीच्या
कार्यकर्त्यांची नावे आहेत. पत्रकार कृष्णा वर्पे यांनी यासंदर्भात
पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांत तक्रार केली होती.
सचिन
कुंभार याने कृष्णा वर्पे यांच्या पत्नीबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
याप्रकरणी राष्ट्रवादीचा आणखी एक कार्यकर्ता मोहसीन शेख याने वर्पे यांना
फोन करुन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुंभार आणि
महादेव बालगुडे या दोघांनी पुन्हा एकदा वर्पेंच्या पत्नीविषयी फेसबुकवर
अश्लील लिखाण केले होते.
कुंभार,बालगुडे
आणि मोहसीन शेख हे तिघेजण अनेक दिवसांपासून कृष्णा वर्पेंना त्रास देत
आहेत. परंतु वर्पेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु पत्नीबाबत आक्षेपार्ह
लिखाण केल्यानंतर वर्पे यांनी पुण्यातल्या विश्रामबाग पोलील ठाण्यात तक्रार
दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांविरोधात कलम 500, 507 तसेच आयटी
अॅक्ट 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात
राष्ट्रवादीच्या खासदार
सुप्रिया सुळे यांना, काही पत्रकारांनी विचारले असता त्यांनी संबंधित कार्यकर्त्याना नोटीस पाठवून जाब विचारला जाईल, अशी ग्वाही दिली.