रायकर गेले , बाविस्कर आले ! मानबिंदूचे चांगभले !

मुंबई - महाराष्ट्राच्या मानबिंदूमधून समूह संपादक दिनकर रायकर यांना अखेर निवृत्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर विजय बाविस्कर विराजमान झाले आहेत. रायकर आता सल्लागारच्या भूमिकेत राहतील. दुसरीकडे औरंगाबादमध्ये सुधीर (भाऊ) महाजन येत्या मार्च/ एप्रिल महिन्यात सेवानिवृत होणार आहेत. त्यांना मुदतवाढ मिळणार की नवा कँप्टन येणार याकडे लक्ष वेधले आहे. 

एकीकडे प्रिंट मीडिया अडचणीत आला असताना, महाराष्ट्राच्या मानबिंदूने आहे त्या परिस्थितीत नंबर १ राहण्यासाठी सतत बदल केले आहेत. त्यांची खरी  टक्कर सकाळशी राहणार आहे. नागपूर, नाशिक आणि औरंगाबादमध्ये लोकमतने नंबर १ चा किताब मिळवला असला तरी, पुणे, मुंबई आणि कोल्हापूर मध्ये म्हणावा तसा जम बसवता आला नाही. पुण्यात सकाळ, कोल्हापुरात पुढारी आणि मुंबईत महाराष्ट्र टाइम्सचे आव्हान कायम आहे. 

नवे समूह संपादक विजय बाविस्कर यांनी, पुण्यात अनेक वर्ष घालूनही सकाळला टक्कर देणे जमले नाही.त्यांनी आता मुंबई गाठली असली तरी महाराष्ट्र टाइम्स त्यांना जमू देत नाही. तसेच इतर आवृत्तीचे संपादक त्यांना 'साहेब' मानायला तयार नाहीत, अश्या परिस्थितीत ते लोकमतचा डोलारा कसा सांभाळणार ? हे एक कोडे आहे.

औरंगाबादमध्ये नवा कॅप्टन कोण ? 
 
औरंगाबाद आवृत्तीचे  संपादक सुधीर (भाऊ ) महाजन येत्या  मार्च/ एप्रिल महिन्यात सेवानिवृत होणार आहेत.त्यांनी आपणास मुदतवाढ मिळावी यासाठी फिल्डिंग लावली असली तरी बाबूजी त्यांना मुदतवाढ देणार की नारळ देणार ? याकडे लक्ष वेधले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने सुधीर महाजन यांना एक वर्षासाठी मुदतवाढ मिळेल, असे सांगितले जात आहे. मात्र नारळ दिल्यास नवा कँप्टन  कोण राहणार याबाबत चर्चा रंगली आहे. 

सोलापूरहुन औरंगाबादमध्ये आलेले आणि सध्या राजकीय संपादक असलेले राजा माने  औरंगाबाद आवृत्तीचे संपादक होण्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. मात्र बाबूजी नवा चेहरा शोधत आहेत, अशी चर्चा आहे.