'फदया फदफदे'ला व्यवस्थापनाचा 'दिव्य' दणका !

औरंगाबाद - वारंवार तोंडी आदेश देऊनही राजीनामा न देता निर्लज्जपणे खुर्चीला चिकटून बसलेल्या 'फदया फदफदे'ला व्यवस्थापनाचा अखेर 'दिव्य' दणका दिलाय.  वेतनात 50% कपात करण्यात आली असून 31 मार्चनंतरही निर्लज्जपणा कायम राहिल्यास 1 एप्रिल 2019 पासून फक्त 25% वेतन देणार असल्याची माहिती पुढे आली आहे.   'फदया फदफदे आणि त्याच्या दोन पंटरला ३१ मार्चअखेर राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हे  दोन  पंटर परवा पद्मश्रीच्या दारात जावून आले. मात्र येथे त्यांची डाळ शिजली नाही. 

 'नि:पक्ष आणि निर्भीड' वाटचालीला, आपल्या बगलबच्चे, चमच्यांच्या 'सुमार' भरतीने, 'फद्या'ने खोळंबवून टाकले होते. या नालायक माणसाच्या घाणेरड्या आणि नीच राजकारणामुळे व सुमार वकूबामुळे संस्थेचे वाटटोळे होत असून आपला अंक खालावत चाललाय व इतर स्पर्धकांचा 'मानबिंदू' उंचावत चाललाय, हे अखेर व्यवस्थापनाला *पट* ले. त्यामुळे काही लोकांना डिसेंबर 2018 मध्येच ढुंगणावर लाथ मारून बाहेरचा *वे* दाखवला गेला. मात्र, हातातलं कोलीत माकड सहजासहजी सोडेल कसे? 3 महिने अपमानित होऊनही माकड काही संस्था सोडायला तयार नाही. म्हणून मग शेवटी त्याचे वेतन गोठविण्यात आले. 'फद्या फदफदे'सह इतर वरिष्ठ दोघांनाही हा दणका देण्यात आला आहे. त्यातील एकाची जळगावात बदली करण्यात आली आहे. एकूणच 'फदया फदफदे'चा औकातीबाहेर फार फडफडणारा *दीपक* आता विझतोय तर... याचं कुणालाही वाईट वाटणार नाही, कारण कोलीत हाती आल्यानंतर या माकडाच्या डोक्यात मस्ती गेली होती, माज आला होता. या माजाच्या भरात, माजावर आलेल्या या 'फद्या'ने फारच फदफदत आपल्या चमच्यांची सर्वत्र मोक्याच्या जागी वर्णी लावली होती. अनेकांचे नुकसान केले होते. अनेक चांगली लोके, त्यांचे 'कॅलिबर' डावलून त्यांच्यावर अन्याय केला होता. 'फद्या'च्या माकडचाळ्यांमुळे अनेक चांगली माणसे सोडून गेली. अतिशय जबरदस्त सुरुवात करून सारा महाराष्ट्र आपल्या कवेखाली घ्यायला निघालेल्या मिशनची या फद्याने पार वाट लावली. डे वन पासून नंबर 1 असलेल्या अंकाची पार वाट लावून टाकली, संस्थेची वाट लावून टाकली. आपले बगलबच्चे बसवून जागोजागी 'कलेक्शन सेंटर्स' निर्माण केली, एजंट नेमले. दर्जा व व्हॅल्यू बाजूला सारून 'दलाली'च्या गणितानुसार महत्त्व ठरू लागले. साहजिकच अंकाची, दर्जाची वाट लागली. उशिरा का होईना, व्यवस्थापनाला खरे गुन्हेगार सापडले आहेत. अनेकांची हाय लागलीय. माजलेल्या सांडाची अवस्था आज वाईट आहे. कुत्रं विचारेनासे झालंय. तरीही कुत्र्याचं जीणं स्वीकारून अजून लाचारपणे जिभल्या चाटणे सुरूच आहे. पण यावेळी ही चाटूगिरी कामी येणार नाही. इकडे-तिकडे फिरून हाता-पाया जोडून *पुण्य* पदरात पडते का त्याचे आता प्रयत्न सुरू आहेत. पण चुकूनही कुणी मदत केली तर ही घाण पुन्हा जळगाववर डोळा ठेवून आहे. *थोरा* मोठयांचे हाता-पाया पडूनही धुळ्यातही जाण्याची तयारी आहे. हा फदया 100% पगार गोठविला तरी स्वतःहून जाणार नाही बाहेर. स्वाभिमान गमावलेला लाचार माणूस कसला जातोय? आता या फदयाने पेरलेल्या सुमार चमच्यांचा नंबर येणार आहे. आट-पाट नगरातील कहाण्या विसरले होते सारे, आभाळाला लाथा झाडत होते... *उतणार नाही, मातणार नाही* हे लहानपणापासून शिकलेलं विसरायचं नसतं कधी. नायतर माज उतरायला वेळ लागत नाही, कुत्र्याचं जीणं नशिबी येतं.
सोलापुरी ओबामा यांचे दिव्य पाऊल  पडल्यापासून अंकात बरेच बदल घडलेत. अंकाचा दर्जा बदलला आहे. त्यांनी पाट्या टाकणाऱ्यांना कामाला लावलं आहे. रोज रिपोर्टींग ठेवण्यात आल्यामुळे अनेक ब्युरोची मिजास बंद झाली आहे.   पूर्वी अनेक ब्युरो पाट्या टाकत होते. अनेक ब्युरोनी दुसऱ्याच्या नावे जाहिरात एजन्सी चालवून चुना लावला होता. त्याची सध्या चौकशी सुरु आहे.