मुंबई - मराठी डिजिटल मीडियात अखेर ई -टीव्ही भारत ( महाराष्ट्र ) चे पाऊल पडले आहे. रामोजी रावांच्या पुढच्या पिढीने ईनाडू इंडिया बंद करून आता ई- टीव्ही भारत सर्व भाषेत सुरु केले आहे. मोबाईल अँप च्या माध्यमातून हे माध्यम सुरु झाले आहे.
हैद्राबादच्या
इनाडू ग्रुपने सन २००० मध्ये पहिले मराठी खासगी चॅनल सुरु केले होते. काही
वर्षांपूर्वी हे चॅनल मुकेश अंबानी यांना विकण्यात आले. सध्या त्याचे नाव
कलर मराठी झाले आहे. इनाडू ग्रुप सर्वात पॉवरफुल्ल असल्याने त्यांच्या
डिजिटल व्हर्जनकडे लक्ष वेधले होते. बरेच दिवस या अँपची चर्चा सुरु होती.
अखेर हा अँप पब्लिक करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी या अँपचा औपचारिक शुभारंभ केला.
व्हिडीओ, टेस्ट, फोटो बातम्या सर्वात अगोदर देण्याचा प्रयत्न हे माध्यम करणार आहे. अनेक कार्यक्रम लाइव्ह दिसणार आहेत. त्यामुळे वाचकांसाठी एक वेगळे व्यासपीठ निर्माण झाले आहे.
डिजिटल
माध्यमात एका मोठ्या ग्रुपचा प्रवेश झाल्याने आता हळूहळू मोठे ग्रुप
डिजिटल माध्यमाकडे वळतील. आता टाइम्स नाऊच्या मराठी वेबसाइटची प्रतीक्षा
आहे.