औरंगाबाद - लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांना एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे इच्छूक संपादकांच्या
स्वप्नांवर
पाणी पडले आहे.
महाजन यांना नियमानुसार प्रशासनातून सेवानिवृत्त करण्यात आले.
तसा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही ६ मार्च रोजी घेण्यात आला. मात्र याच
कार्यक्रमात राजेंद्र दर्डा यांनी, जो पर्यंत महाजन यांचे हातपाय चालतील
तोपर्यंत ते लोकमतसोबत राहतील, अशी घोषणा केली.
महाजन यांना नियमानुसार
प्रशासनातून सेवानिवृत्त करण्यात आले, मात्र कमी पगारात पुन्हा नव्याने
संपादक म्हणून घेण्यात आल्याचे कळते. महाजन यांच्या फेरनियुक्तीनंतर
राजा माने, प्रेमदास राठोड यांच्या
स्वप्नांवर पाणी पडले. तसेच सेकंड फळीतील टीम नाराज झाली.
लोकमत मध्ये आता नवीन ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त होतील पण काम चांगले असेल तर त्यांना
निम्म्या पगारात पुन्हा कामावर घेण्यात येत आहे. स,सो. खंडाळकर, प्रभुदास
पाटोळे नंतर आता सुधीर महाजन यांना काही दिवस ब्रेक देवून पुन्हा नव्याने
घेण्यात आले आहे.
१० वर्षांपासून पदोन्नती नाहीलोकमतमध्ये गेल्या १० वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळालेली नाही. अनेक कर्मचारी आहे त्या पदावर काम करत आहेत. त्यांना पदोन्नती केव्हा मिळणार हे एक कोडेच आहे.