औरंगाबादमधून सुरु होणाऱ्या एका चॅनलमध्ये #metoo चा प्रकार घडला आहे. बेलापूर चॅनलमध्ये 'आगाव'पणा करून औरंगाबादमध्ये आलेल्या या 'अशांत' माणसाने एका मुलीला रात्री - बेरात्री फोन करून कास्टिंग काऊच केले. त्यामुळे सदर मुलीने राडा करत राजीनामा दिला आहे. या प्रकाराने इतर महिला कर्मचारीही संतप्त झाल्या आहेत.
मुंबईच्या बेलापूर
चॅनलमध्ये
कास्टिंग काऊच केल्यामुळे या
'आगाव'पणा करणाऱ्या माणसाची हकालपट्टी होणार होती. तत्पूर्वीच त्याने
औरंगाबादहून सुरु होणारे चॅनल गाठले, त्याच्याकडे म्हणे आऊटपूट हेड
जबाबदारी आहे. त्याने या पदाचा गैरवापर करत एका मुलीला जाळ्यात ओढण्याचा
प्रयत्न केला. येथेही त्याने हाच आगावपणा केला. या विकृत माणसाने सदर
मुलीला रात्री
बेरात्री फोन करून त्रास देण्याचा प्रयत्न केला.
सदर मुलगी ही मुंबईची असून, तिने आपल्या पालकास बोलावून राडा केल्याचे
समजले.आपली बदनामी होईल या भीतीपोटी तिने राजीनामाही दिला आहे. या प्रकाराने इतर मुलीही संतप्त झाल्या आहेत.चॅनल प्रशासन या आगाऊपणा करणाऱ्या माणसावर काय कारवाई करते याकडे लक्ष वेधले आहे.