मुंबई - न्यूज १८ लोकमतचा अवघ्या पाच महिन्यात राजीनामा दिलेल्या उमेश कुमावत यांनी पुन्हा एकदा
टीव्ही ९ मराठीचे दार ठोठावले आहे. इकडे
न्यूज १८ लोकमतमध्ये कोण जॉईन होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही.
टीव्ही ९ मराठीचे विद्यमान संपादक रोहित विश्वकर्मा हे दिल्लीत टीव्ही ९ भारतवर्ष साठी जॉईन होणार आहेत. त्यामुळे उमेश कुमावत यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. कुमावत यांनी अवघ्या तीन महिन्यातच टीव्ही ९ मराठी ला सोडचिठ्ठी देवून नंतर
न्यूज १८ लोकमतला जॉईन झाले होते , मात्र तेथेही बस्तान न बसल्यामुळे पुन्हा एकदा
टीव्ही ९ मराठी जॉईंन करणार आहेत. टीव्ही ९ मराठीसाठी डॉ. उदय निरगुडकर
हेही प्रयत्नशील होते. मात्र त्यांची डाळ शिजली नाही. आता कुमावत टीव्ही ९
मराठी मध्ये किती दिवस टिकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.