भोईटे यांचे एबीपी माझावर अखेर 'तुळशी'पत्र !

मुंबई - बेरक्याचे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. एका ठिकाणी स्थिर न राहणाऱ्या तुळशीदास भोईटे यांनी अखेर एबीपी माझावर 'तुळशी'पत्र   ठेवून  टीव्ही ९ मराठी  जॉईन केले आहे. वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून त्यांना घेण्यात आले असून इनपूट आणि आऊटपूट  समन्वयक (Cordinator) याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तुळशीदास भोईटे हे एका ठिकाणी स्थिर न राहणारे व्यक्तिमत्व ! सहा महिन्यात युनिट बदलण्याची त्यांची  जुनी परंपरा आहे. ही  परंपरा त्यांनी एबीपी माझा  सोडताना कायम ठेवली आहे. एबीपी माझा, टीव्ही ९  पासून सुरु झालेला प्रवास दोन वर्तुळ पूर्ण करून पुन्हा एबीपी माझा ,  टीव्ही ९ असा सुरु झाला आहे.

टीव्ही ९ मराठी मध्ये अगोदरच  निखिला म्हात्रे, गजानन कदम, माणिक मुंडे, सुनील बोधनकर असे चार कार्यकारी संपादक आहेत.त्यात  तुळशीदास भोईटे यांची भर पडली आहे. संपादक पदाचा चार्ज रोहित विश्वकर्मा यांच्याकडे कायम आहे. जुने चारही कार्यकारी संपादक थेट संपादकास रिपोर्ट करणार आहेत. त्यामुळे भोईटेना काम करण्यास पुन्हा एकदा अडचण निर्माण होणार आहे. ते टीव्ही ९ मराठी मध्ये किती दिवस रमणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


भोईटेचे गोलाकार वर्तुळ

> टीव्ही ९ ( आता दुसरी वेळ )
> झी २४ तास ( दोन वेळा )
> एबीपी माझा ( दोन वेळा ) 
> जय महाराष्ट्र ( दोन वेळा )
> ईटीव्ही मराठी ( १ वेळा )
> आयबीएन ७ ( १ वेळा )
>   मी मराठी ( १ वेळा )
> लोकमत ऑनलाईन ( १ वेळा )
> जनशक्ती पेपर ( १ वेळा )

सात जणांना नारळ भेटणार
टीव्ही ९ मराठी मधून एकूण ७ जणांना नारळ देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. पैकी चार जणांना अगोदरच राजीनामा देण्यास सांगितले असल्याचे वृत्त आहे. या सर्वावर अकार्यक्षमपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.