मुंबई - राहा एक पाऊल मागे मधून रिपोर्टर चिपाली वर्ल्डताप हिला अखेर नारळ देण्यात आला आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही जुन्या कर्मचाऱ्याना नारळ देण्यात येणार असल्याचे कळते. त्यामुळे जुने कर्मचारी अस्वस्थ दिसत आहेत.
डॉ. गुडगुडकर गेल्यानंतर चॅनलची धुरा विग कमांडरकडे आली होती, मात्र शुगरे आणि काळूमामाने त्यांचा गेम केला. त्यानंतर आलेल्या आशिष दिवाने यांनी स्वतःची विकेट पडण्याअगोदरच शुगरेला बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर अनेक जुने कर्मचारी निशाण्यावर असताना
रिपोर्टर चिपाली वर्ल्डताप हिने स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे.
चॅनलच्या आतील गोष्टी बाहेरच्या रिपोर्टरना सांगणे, वरिष्ठाबद्दल बॅड कमेंट करणे, गॉसिफ करणे हे नित्याचे झाले होते. त्याची व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिपच
चिपाली वर्ल्डतापच्या जवळ बसणाऱ्या लोकांनी तयार करून वरिष्ठाना पाठवली. स्वतःचे बिंग फुटताच
चिपाली वर्ल्डतापने स्वतःहून राजीनामा दिला. प्रशिक्षणार्थी पासून
चिपाली वर्ल्डताप आठ ते नऊ वर्षांपासून
राहा एक पाऊल मागे मध्ये रिपोर्टर म्हणून कार्यरत होती.
चिपाली वर्ल्डतापचा धनी चॅनलचा प्रोड्युसर असल्याने प्रत्येक बातमी अवघ्या काही मिनिटात ऑन एयर जात होती. त्यामुळे बाहेर तिचा दबदबा वाढला होता. त्याच्या जोरावर मस्त दुकानदारी सुरु होती. तिने चॅनलच्या बळावर काही नेत्यांची सोशल मीडिया हॅन्डलची कामे घेतली होती. तेही चॅनलच्या लक्षात आले होते.
शुगरे, आजोबा ,
चिपाली वर्ल्डताप नंतर आता काळू मामा चा नंबर आहे. तो कधी लागणार ? याकडे लक्ष वेधले आहे.