अशोक पानवलकर 'मटा' मधून निवृत्त

मुंबई - महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीमधील शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा  प्रवास करून अशोक पानवलकर हे ३१ डिसेंबर रोजी महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त होत आहेत.पानवलकर यांची जागा पराग करंदीकर यांनी घेतली आहे.

भारतकुमार राऊत खासदार झाल्यावर  अशोक पानवलकर  यांच्याकडे २००८ मध्ये ‘मटा’ संपादकपद आले होते. शिकाऊ उपसंपादक ते आठ आवृत्त्यांचा कार्यकारी संपादक ( मुख्य संपादक ) असा  प्रवास   करताना  पानवलकर  यांनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये अनेक स्थित्यंतरे पाहिली. त्यांचे ‘तरंग’ हे सदर सव्वासात वर्षे चालू होते. त्याचीही अखेर त्यांनी मटामधील प्रवासाबाबत लिहून केली.

हा लेख त्यांनी स्वतःच्या फेसबुकवर पोस्ट केला आहे.