युवा पत्रकार सूरज पाटीलला किडणीच्या आजाराने ग्रासले

औषधोपचारासाठी कुटुंबाला हवी आर्थिक मदत

नागपूर : एक युवा धडपड्या पत्रकाऱ वय जेमतेम ३५ वर्ष़ घरची परिस्थिती हलाखीची़ तरीही अनेक गोरगरीब गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती़ स्वत: संस्था स्थापन करून अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा़ गुणवंतांची दखल करणारा़ एका वाक्यात सांगायचे झाल्यास अनेकांसाठी आशेचा किरण ठरणारा़ मात्र, आज तोच सूरज किडणी आजाराने ग्रस्त आहे़ अंधारात चाचपडतो आहे़ सच्चा समाजसेवक असलेल्या सूरजलाच आज मदतीची गरज आहे़

किडणीच्या आजाराने त्रस्त असलेला हा धडपड्या पत्रकार म्हणजे नागपूरला लागून असलेल्या विहीरगाव येथील सूरज पाटील़ सध्या तो दै़ तरुण भारत या वृत्तपत्रात कार्यरत आहे़ मात्र, डॉक्टरांनी ‘कम्पलिट बेडरेस्ट’ सांगितल्याने गेल्या सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळून आहे़ एकीकडे आजाराने त्रस्त तर दुसरीकडे संसाराचा गाडा कसा हाकलावा, याची भ्रांत त्याला नीट विश्रांतीही घेऊ देत नाही़ सर्वकाही सुरळीत असताना हाच सूरज अनेकांच्या मदतीला धावून जायचा़ मग तो गरजू व्यक्ती ओळखीचा असो किंवा नसो़ याचा त्याने कधीही विचार केला नाही.
 पत्रकारितेदरम्यान मेडिकल बिट सांभाळताना अनेकांना उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी तत्पर असायचा़ कुणीही एक फोन केला की, सूरज थेट मेडिकल अधिष्ठाता यांना कॉल करायचा़ एवढेच नव्हेतर स्वत: जाऊन संबंधित रुग्णाची भेट घेऊन ‘घाबरू नका मी आहे’असे म्हणून धीर द्यायचा़ वेळ पडल्यास आर्थिक मदत करण्यासाठीही मागेपुढे बघत नव्हता़ गोरगरिबांना न्याय मिळावा़ युवकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे़ गुणवंतांना प्रोत्साहन देता यावे, म्हणून स्वत: काही सहकाºयांना सोबत घेऊन आनंद बहुउद्देशीय संस्था स्थापन केली़ 
या माध्यमातून मुले, मुली, युवक यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळवून दिला़ एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले़ एवढेच नव्हेतर आरोग्य शिबिर, गुणवंताचा सत्कार सोहळा, ग्रामस्थांची सहल, असे अनेक समाजोपयोगी उपक्रम सूरज राबवितो़ या संस्थेच्या माध्यमातून गावाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली़ संसाराचा गाडा हाकण्यासोबतच अनेक उपक्रम राबविताना कशाचीही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून नोकरीसोबतच वर्तमानपत्र घरोघरी वाटण्याचेही काम सूरज करायचा़ त्यात कधी कशाचाही कमीपणा वाटून घेतला नाही़ मात्र, आज अत्यंत कमी वयात किडणीच्या आजाराने ग्रासल्याने आता पुढे कसे होईल़ डॉक्टरची फी आपली पत्नी कशी देईल, याची चिंता सूरजच्या चेहºयावर स्पष्ट दिसते आहे़ या आजाररुपी संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे़ 


तीनवर्षीय चिमुकली अन् वृद्ध वडिलांची जबाबदारी

चार वर्षांपूर्वी सूरजचा विवाह झाला़ या संसाररुपी वेलीवर एक फुल उमललं़ साची तिचं नाव आहे़ साची आज तीन वर्षांची आहे़ आपल्या बाबाला काय झाले, हे तिला कळतसुद्धा नाही़ त्यातच ८० वर्षीय वृद्ध वडिलांची जबाबदारीही त्याच्या खांद्यावर आहे़ मुलगा अंथरुणाला खिळल्याने वडीलही चिंताग्रस्त आहे़ सूरज ऐवजी हा आजार मला झाला असता तर बरे झाले असते, असे म्हणून ते दररोज अश्रू ढाळतात़


इच्छुकांनो, येथे करा मदत

सूरजची पत्नी सौ. एकता पाटील यांचा मोबाइल क्रमांक ९५११६७५०१५ असा आहे. तसेच मदत जमा करण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया (शाखा दिघोरी) ३६७२५३५०४३ हा खाते  क्रमांक आहे. आपण सौ. एकता पाटील यांच्याशीही संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता. आम्ही सूरजचे मित्र, सहकारी म्हणून हे आवाहन २६ जानेवारी २०२० रोजी करीत आहोत.

- अविनाश महालक्ष्मे, महाराष्ट्र टाइम्स-  (९९२२४३१७६८)
- संतोष तायडे, देशोन्नती (९८५०३८८६०८)
- अभिषेक तिवारी, नवभारत (९८९०२३४७२९)
- अखिलेश गणवीर, देशोन्नती (९७६४९९७४६६)
- पियुष पाटील, नवराष्ट्र (९९७५६४०२४०)
- शैलेश भोयर, तरुण भारत (८८०५००२२९०)