मुंबई -
महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणणाऱ्या दैनिक लोकमत ने पुन्हा एकदा आपल्या सर्वच प्रतिस्पर्धी
दैनिकाबरोबर पंगा घेतला आहे. आम्हीच नंबर १ असल्याचा दावा करणाऱ्या
लोकमतने २८ जानेवारीच्या अंकात सर्व आवृत्यांमध्ये शाई शपथ अशी जॅकेट
जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रतिस्पर्धी दैनिकापेक्षा लोकमत नंबर १
कसा आहे, याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे मराठी माध्यमात न्यूज पेपर वॉर
पुन्हा होण्याची शक्यता आहे.
मुंबईत महाराष्ट्र टाइम्स, पुण्यात सकाळ, कोल्हापुरात पुढारी, औरंगाबाद मध्ये दिव्य मराठी, अकोल्यात देशोन्नती, सोलापुरात संचार, नाशिक, नागपुरात लोकमत आपापले स्थान टिकवून आहेत. पण प्रत्यक्ष खप यांची आकडेवारी न दाखवता वाचक संख्या दाखवून लोकमत आम्हीच नंबर १ असल्याचा दावा करीत आहे. यामुळे प्रतिस्पर्धी दैनिकाचे मालक संतप्त झाले असून, लोकमतला शह देण्यासाठी काही योजना आखत आहेत. त्यातून मुंबईच्या एका दैनिकाने लोकमतच्या त्याच जाहिरातीची कॉपी करून ट्रोल केले आहे. ही ट्रोल करणारी जाहिरात सोशल मीडियावर फिरत आहे.