पुण्यातील हाय प्रोफाइल खंडणी प्रकरणी टीव्ही मीडिया झोपला !

पुणे - पुण्यात सध्या गाजत असलेल्या हाय प्रोफाईल खंडणी प्रकरणाच्या बातम्या एकाही टीव्ही चॅनल्सवर अद्याप झळकल्या नाहीत, त्यामुळे पुणेकरांत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान खंडणी प्रकरणात अडकलेला पोलीस मित्र जयेश कासट याला दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुणे शहरातील एका नामांकित डॉक्टरला बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्हयात अडकवण्याची भीती दाखवत १ कोटी ३० लाख रुपये खंडणीची मागणी करून ७५ लाख रुपये उकळणाऱ्या आरोपीकडून पोलीस मित्र म्हणून मिरवणारा जयेश कासट ( रा. नारायण पेठ ) याने पाच लाख रुपये खंडणी उकळली होती.शनिवारी त्यास अटक झाली. रविवारी त्यास न्यायालयात उभे करण्यात आले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.

या प्रकरणाच्या बातम्या पुण्यातील सर्व वृत्तपत्रात दररोज येत आहेत. पुणे  मिरर नेही आज सर्व भांडाफोड केला आहे. असे असताना, एकाही टीव्ही चॅनल्सवर त्याच्या बातम्या नाहीत. एरव्ही प्रिंट मीडियाची कॉपी करणारे, टीव्ही मीडियाचे पत्रकार चक्क डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसले आहेत. या खंडणी प्रकरणात बडे पोलीस अधिकारी अडकले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचा रोष नको म्हणून टीव्ही मीडियाचे पत्रकार xxx  शेपूट घालून गप्प बसले आहेत.

पुण्यातील काही पोलीस अधिकारी रित्या कासटच्या विघ्नहर्त्या न्यासाबरोबर काम करीत होते. गणेशोत्सवात हा कासट पोलिस व्यासपीठावर मिरवत होता. त्यामुळे त्याच्या या पराक्रमात पोलिस आणि पत्रकार सामील असल्याशिवाय ते शक्य नाही, अशी चर्चा आहे. कासट हा काही पत्रकारांना दर महिन्याला पाकिटे देत होता, त्यामुळे त्याच्या चांगल्या बातम्या अनेक वृत्तपत्रात झळकत होत्या. कासटला अटक झाल्यानंतर अनेक पत्रकारांचे चेहरे पडले आहेत.