मुंबई - झी २४ तासचे संपादक आशिष जाधव यांच्या सहा महिन्याच्या कारकिर्दीत संदीप साखरे आणि विठोबा सावंत या जोडगोळीची सद्दी अखेर संपली आहे. इनपुट हेड संदीप साखरे यांना नारळ देवून नरेंद्र बंडबेंना इनपुट हेड करण्यात आल्यानंतर आता आऊटपुट हेड विठोबा सावंत यांनाही नारळ मिळण्याची शक्यता आहे. आऊटपुट हेड म्हणून अभिजित कांबळे आज जॉईन झाले आहेत.
झी २४ तास मध्ये गेल्या १०- १२ वर्षांपासून संदीप साखरे आणि विठोबा सावंत या जोडगोळीची निर्विवाद सत्ता होती. संपादक कोणीही आले तरी हे दोघे त्या संपादकाचा गेम करत होते. मात्र आशिष जाधव वस्ताद निघाले असून, त्यांनी या दोघांना घरचा रस्ता दाखवला आहे.
काही दिवसापूर्वी संदीप साखरे यांना नारळ देण्यात आल्यानंतर आता विठोबा सावंत यांनाही नारळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विठोबाला सध्या आऊटपुट हेड पदावरून काढून वेबला टाकण्यात आले आहे.
आऊटपुट हेड पदावर बीबीसी मराठीचे अभिजित कांबळे जॉईन झाले आहेत. कांबळे यापूर्वी टीव्ही ९ मराठीला होते.
झी २४ तास मध्ये अँकर म्हणून काही दिवसापूर्वी शैलजा जोगल ( साम व्हाया जय महाराष्ट्र ), रेश्मा साळुंके ( एबीपी माझा व्हाया न्यूज १८ लोकमत ) जॉईन झाले आहेत.
0 टिप्पण्या