अर्णब गोस्वामींविरोधात FIR दाखल


मुंबई- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या  रिपब्लिक टीव्हीचा  संपादक अर्नब गोस्वीमी यांच्याविरोधात नागपूरमध्ये FIR दाखल करण्यात आला आहे. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.

महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धर्माच्या आधारे दोन समुदायांमध्ये भांडणं लावण्याच्या उद्देशानं केलेलं वक्तव्य, धार्मिक भावना दुखावण्यासाठी केलेली कृती या बाबींचा या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी एका कार्यक्रमात पालघर लिंचिंग प्रकरणाबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीविरोधात वक्तव्यं केली आहेत. त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेयर होत आहेत.

Post a Comment

0 Comments