उस्मानाबाद - ई टीव्ही भारतच्या उस्मानाबादच्या रिपोर्टरला एका न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करणे खूप महागात पडले आहे. त्याला आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला यामुळे मुकावे लागले आहे.
घडले असे की, ई टीव्ही भारतच्या असाइनमेंट नुसार कैलास चौधरी हा बुधवारी दुपारी आपल्या घराच्या गच्चीवर एका न्यूजसाठी लाइव्ह पिटूसी करीत होता. ऑफिसने दिलेला मोझो (मोबाईल) द्वारे त्याची पत्नी चित्रिकरण करीत होती . खाली त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा कैवल्य खेळत होता. खेळत - खेळत तो घराच्या आवारातील अंडरग्राउंड पाण्याच्या हौदात जावून पडला. १५ मिनिटानंतर चौधरी पती -पत्नी खाली आले तर त्यांचा मुलगा दिसेनासा झाला. त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली, शेवटी संशय आल्याने पाण्याच्या हौदात पाहिले तर मुलगा कैवल्य पाण्यात बुडून मृत झाला होता.
सौजन्य - उस्मानाबाद लाइव्ह
सविस्तर बातमी वाचा
वाईट बातमी : लाइव्ह पिटूसी करणे रिपोर्टरला पडले महागात
0 टिप्पण्या