लोकमतचे संपादक सुधीर महाजन यांना पुन्हा मुदतवाढ



औरंगाबाद - लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीचे संपादक सुधीर महाजन यांना पुन्हा एकदा दोन वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे संपादक पदासाठी इच्छूक असलेल्या अनेकांच्या स्वप्नांवर पाणी पडले आहे. 

संपादक सुधीर महाजन यांना मागच्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे मुदतवाढ मिळाली होती तर आता कोरोनामुळे पुन्हा एकदा ३० टक्के पगारावर महाजन यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे संपादक पदासाठी इच्छूक असलेले अनेकजण मनातून दुःखी झाले आहेत तसेच अनेक जिल्हा प्रतिनिधीचा मूड खराब झाला आहे. 

दरम्यान सेवानिवृत्त होवूनही पुन्हा मानधनावर कामावर आलेले स.सो. खंडाळकर ( सामाजिक बिट रिपोर्टर ) आणि प्रभुदास पाटोळे ( कोर्ट बिट रिपोर्टर ) यांना १ जुलै पासून कायमचा नारळ देण्यात आला आहे. 


३० टक्के वेतन कपात 
कोरोनामुळे लोकमत पूर्ण डाऊन झाला आहे. खप पूर्णपणे घसरला आहे. जाहिरात बिझिनेस थंडावला आहे. त्यामुळे लोकमत कर्मचाऱ्यांचे ३० टक्के वेतन कपात सुरु आहे. तसेच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत पण कामावर आले आहेत त्यांचा ५० टक्के पगार कापला जात आहे. 

आठ कर्मचाऱ्यांना कोरोना 
लोकमतच्या औरंगाबाद आवृत्तीतील आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे लोकमत कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान कर्मचाऱयांना आपापल्या घरातून काम करण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास ९० टक्के कर्मचारी वर्क फ्रॉम होम  काम करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या