पुण्यनगरी गडहिंग्लज कार्यालयाचा गाशा गुंडाळला

कोरोनाचे कारण की कारणीभूत कोल्हापूर आवृत्तीतील राजकारण ?




  गडहिंग्लज - सध्या कोरोनाच्या महामारीत सर्वच दैनिकांनी कॉस्ट कटिंग सुरु केली आहे. कोरोना हे एक निमित्त ठरत आहे. मात्र एकमेकांचे पंख छाटण्याचे काम यातून होत आहे. आपणाला अडसर ठरणार्‍याचा पद्धतशीरपणे गेम केला जात आहे. अशाच पद्धतीने दैनिक पुण्यनगरीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज विभागिय कार्यालयाचा गाशा गुंडाळण्यात आला आहे. गडहिंग्लज शहरात सर्वच महत्त्वाच्या दैनिकांची विभागीय कार्यालये आहेत. येथून गडहिंग्लज, चंदगड, आजरा तालुक्यातील संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवली जाते. अगदी सीमाभागावर तसेच कोकणातील आंबोली, सावंतवाडी येथे देखील लक्ष ठेवण्यात येते. अशा महत्त्वपूर्ण असणार्‍या गडहिंग्लज विभागीय कार्यालयाचा गाशा पुण्यनगरीने गुंडाळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

गडहिंग्लज कार्यालय येथे प्रदिप पाटील हे विभागीय प्रतिनिधी आहेत. आणखी जाहिरात प्रतिनिधी, वितरण प्रतिनिधी, अॉपरेटर वगैरे मंडळी कार्यरत होती. प्रदिप पाटील हे श्रीकांत हिरवे पुण्यनगरीच्या कोल्हापूर आवृत्तीचे सरव्यवस्थापक असताना पुढारीतून पुण्यनगरीत दाखल झाले. ते बातम्यांपेक्षा इतर कारणांनी चर्चेत होते. याचदरम्यान अशोक घोरपडे यांनी आवृत्ती संपादक म्हणून कारभार स्विकारला. त्यांनंतर पाटील हे घोरपडे यांच्या गळ्यातील ताईत बनले. नुकतेच घोरपडे यांना पुण्यनगरीने घरी बसविले. त्यामुळे त्यांच्या गळ्यातील ताईत असणार्‍या पाटील यांची पंचाईत झाली. याचा परिणाम पाटील यांचे गडहिंग्लज विभागीय कार्यालय बंद करण्यात झाला. असे बोलले जात आहे. कोरोनामुळे काही काळ अॉफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काही मंडळी सांगत असतील तरीही कोल्हापूर अॉफिसवाल्यांनी टेंपो भरून सर्वच साहित्य नेल्याची चर्चा शहरात जोरात आहे. प्रदिप पाटील यांच्याकडून गडहिंग्लज विभागीय कार्यालयाचा भार काढून घेऊन फक्त मानधन तत्वावर गडहिंग्लज प्रतिनिधी पदावर बोळवण करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या