मानबिंदूच्या कोल्हापूर आवृत्तीत आणखी दोघेजण कोरोना पॉजिटीव्ह

समूह संसर्गाचा धोका ; कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण 


कोल्हापूर - मानबिंदूच्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ पत्रकारानंतर आणखी दोघांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह  आला आहे. यात एक फोटोग्राफर व एक डिटीपी ऑपरेटरचा समावेश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले असून समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. काही कनिष्ठ कर्मचारी शिवाजी विद्यापीठात तर  वरिष्ठ एका हॉटेलमध्ये क्कॉरंटाईन आहेत.

दोन दिवसापूर्वी मानबिंदूच्या वरिष्ठ बातमीदाराचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. तरीही   मानबिंदूच्या प्रशासनाने काळजी न घेता लक्ष्मीपुरी येथील कार्यालय सुरु ठेवले होते. यामुळे कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती. वरिष्ठ बातमीदाराचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली. यातील दोघांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत.

दरम्यान, काही वरिष्ठ अधिकारी पॉजिटीव्ह आलेल्यांच्या संपर्कात येऊनही राजरोसपणे बाहेर फिरत होते. यातील एका वरिष्ठांने मानबिंदूच्या एमआयडीसी कार्यालयात जाऊन पॉजिटीव्ह आलेल्यांच्या संपर्कात येऊनही बैठका  घेतल्या. यामुळे एमआयडीसी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असून ते तणावात आहेत. न फुलणारा वसंत 'मला  काय होतय म्हणत' दुसऱ्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य धोक्यात आणत आहे आणि त्याला शेठजी पाठीशी घालत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या