दैनिक लोकमतला हवे आहेत, सहाय्यक संपादक,वृत्तसंपादक, मुख्य उपसंपादक आणि वरिष्ठ उपसंपादक...



मुंबई - महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणून बिरुद मिरवणाऱ्या दैनिक लोकमत मध्ये एकीकडे मोठ्या प्रमाणात कॉस्ट कटींग सुरु असताना, दुसरीकडे आज पुन्हा एक नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई आणि औरंगाबाद सेंट्रल डेक्सवर काम करण्यासाठी सहाय्यक संपादक - २, वृत्तसंपादक - २, मुख्य उपसंपादक  - ७ आणि वरिष्ठ उपसंपादक - ६ जागा भरणे आहेत, अशी जाहिरात आजच्या दैनिक लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

काही दिवसापूर्वी लोकमतच्या नागपूर आवृत्तीमध्ये कार्यकारी संपादक आणि निवासी संपादक पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. परंतु त्या जागेवर अद्याप कुणाचीही नियुक्ती झालेली नाही.

आजची जाहिरात जुन्या कर्मचाऱ्यांना  घाबरवण्यासाठी एक स्टंटबाजी ( युक्ती ) आहे की, खरेच नवीन चेहऱ्याचा शोध बाबूजी घेत आहेत, हे लवकरच कळेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या