अक्कलकोट - वाळूने भरलेला टेम्पो पोलिसांनी पकडल्यानंतर, तो सोडवण्यास आलेल्या लोकमतच्या स्थानिक वार्ताहराने पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली, त्यामुळे पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून लोकमत वार्ताहरावर गुन्हा दाखल केला आहे..
शंकर हिरतोट ( वय ४३ ) असे या लोकमत वार्ताहराचे नाव आहे. हिरतोट याच्यासह चार जणांवर अक्कलकोट पोलिसांनी भादंवि ३५३, ३७९, ५०४, ५०६ ,३४, पर्यावरण कायदा कलम ९,१५ आदी कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हिरतोट यास रविवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
अक्कलकोट - दुधनी रस्त्यावरील बोरी उमरगा चौकात रविवारी रात्री काही पोलिसांनी, वाळूने भरलेला एका टेम्पो पकडल्यानंतर याठिकाणी लोकमत वार्ताहर शंकर हिरतोट ( वय ४३ ) हा बुलेटवरून आला आणि पोलिसांना दमदाटी करू लागला. हा टेम्पो सोडून द्या नाही तर लोकमतमध्ये तुमच्याविरुद्ध बातम्या देईन अशी धमकी देऊ लागला. मी चांगल्या चांगल्याची मस्ती जिरवली आहे, तुम्ही काय चीज आहे, तुमच्या विरोधात मुद्दामहून बातम्या छापतो मग लक्षात येईल शंकर हिरतोट म्हणजे कोण आहे , अशी धमकी दिल्यावरून तसेच शिवीगाळ केल्यावरून पोलिसांनी शंकर हिरतोट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
0 टिप्पण्या