ठाण्यात सुपारीबाज पत्रकाराला अधिकारी वैतागले



मुंबई - स्मार्ट मित्र मधून हकालपट्टी झाल्यानंतर  फेकमताच्या आडोशाला लपलेल्या ठाण्यातील एका सुपारीबाज पत्रकाराने  पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली आहे. आधी परमार प्रकरण आणि नंतर ठाण्यातील क्लस्टर प्रकरणात लाखो रुपयांचा मलिदा लाटल्यानंतर या बत्तमीज बातमीदाराची स्मार्ट मित्र मधून  हकालपट्टी करण्यात आली होती.

सर्व वर्तमानपत्रांचे उंबरठे झिजवल्यानंतर अखेर मोठ्या सुपाऱ्या वाजवण्याच्या आमिशाला बळी पडत बाबुजींनी नवा नोकर ठाण्यात रुजू करुन घेतला. ठाणे प्रधानांनी त्याच्या सर्व कारवाया आणि प्रकरणांची माहिती बाबूजींना देऊन देखील त्यांचा विरोध डावलत त्याची ठाण्यात नियुक्ती केली तीच मुळात स्पेशल प्रोजेक्टसाठी. आता हा सॅंडीबाज नवनवी भ्रष्टाचाराची प्रकरणे उकलण्याचे काम करणार असल्याचे सांगत फेकमतकारांनी त्याला सुपाऱ्या वाजवायला सांगितल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वीच एका मोठ्या वर्तमानपत्राच्या प्रशाननाने आर्थिक गैरव्यवहारात पकडलेल्या बातमीदाराला आपल्याकडे रुजू करुन घेतले याचाच अर्थ यात काहीतरी काळेबेरे असण्याची शक्यता आहे.

ही नियुक्ती थेट मालकांकडून झाली असल्याची चर्चा ठाण्यात बरीच चघळली गेली. एखाद्या संस्थेने आर्थिक कारणावरून काढून टाकलेल्या पत्रकाराला दुस-या संस्थेने घ्यावे हेच मुळी लज्जास्पद होते. ठाण्यात परमार प्रकरण सर्वाधिक गाजले ते या सुपारीबाज पत्रकारामुळेच. तेव्हा ही सुपारीबाज टोळी खूपच बिथरली होती. तेव्हा काही दैनिकातील पत्रकारांनी त्यांच्याच संपादकांनाही आपल्याच सुपारीबाजांच्या तक्रारी केल्या होत्या. पण ऐकतो कोण सर्व एकाच माळेचे मणी. त्यानंतर खमंग चर्चा रंगली ती क्लस्टर विषयाची. ठाण्यातला क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय सर्वांच्याच इंटरेस्टचा. त्यात अनेकांनी रस होताच. पण या क्लस्टरची गाडी पुढे ढकण्याची जबाबदारी काही सुपारीबाज आणि नामवंत पत्रकारांवर होती अशी चर्चा होती. त्यातूनच काहींना लाखांचा मलिदा मिळाला असे ठाण्यातीलच मान्यवर सांगतात.

ठाण्यातील एका मोठ्या हॉटेलात पैशाच्या देवाणघेवाणीचा मोठा सोहळा रंगला होता आणि या देवाणघेवाणीतील पत्रकारांची नावे देखील मोठ्या उत्साहाने घेतली जात होती. सॅंडी या त्रीकूटाचा म्होरक्या होता. हे प्रकरण मुळात उघड झाले ठाण्यातील स्मार्ट मित्रामुळे... दुस-या एका  राजकीय नाराजवंताने थेट तक्रार केली म्हणे स्मार्टच्या मॅनेजमेंटकडे... मग काय झाली चौकशी... त्यातूनच पगाराशिवायची मोठी रक्कम त्यांना दिसली म्हणे खात्यावर.. ही रक्कम आली कुठून... तर म्हणे माझा व्यवसाय आहे... पत्रकार आता कोणता व्यवसाय करतात बरे, असा प्रश्न पडला असावा... कोणत्या व्यवसायातून एवढी मोठी प्राप्ती होते... मग नोकरी कशाला ती हवी... यातूनच सॅंडीप महाशयांना म्हणे नोकरीचा राजीनामा द्यावा लागला... मग काय करणार... हाताशी पेपर नसल्यावर कोण विचारतो हो. त्यातही फेकपत्रकारीतेचा हा ब्रॅंड अॅंम्बेसेडर मग थेटच बाबूजींच्या पायात येऊन पडला.

आर्थिक कारणावरून एखाद्याला काढलेले असतानाही या मालकांनी खूपच मोठेपणा दाखवून या सुपारीबाजांना सुपारी घेण्यासाठीच घेतले. यात स्थानिक संपादकांना सांगण्याची देखील तसदी घेतली नाही, असे तेथील सहकारी सांगतात. सॅंडीप महाशय कार्यालयात रुजू झाले तेव्हाच सर्वांनी ही नियुक्ती समजली म्हणे. पण एवढे काय बरे कामगिरी करावयाची होती सुपारीबाजांकडून. मालकांनी काहीतरी खास कामगिरी करायची असल्याने त्यांना बीट दिले इन्फ्राचे, तेही मुंबईत. मग ठाण्यात लुडबुड कशाला... तर काही काड्या करणे, खोड्या करणे ही काही कामे करण्यासाठीच ही नियुक्त झाली... सर्वांचा विरोध डावलून…आणि आता त्याने सुरु केलीये मोठी दुकानदारी.या  सुपारीबाज पत्रकाराला अधिकारी वैतागले  असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments