हैद्राबादी मनमौज मोशीची अखेर हकालपट्टी


मुंबई - हैद्राबाद मुख्यालय असलेल्या एका  मराठी वेबसाईटचा हेड मनमौज मोशीचे रंगेल चाळे अखेर उघडे पडले असून,त्याची संस्थेतून  हकालपट्टी करण्यात आली आहे. अनेकांची विकेट पाडणाऱ्या मनमौज मोशीची विकेट पडल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त करीत पेढे वाटले आहेत. 


हा मनमौज मोशी वेबसाईटसाठी महाराष्ट्रात रिपोर्टींग करणाऱ्या मुलींना व्हाट्स ऍप वरून ऑफिसशिवाय  पर्सनल गोष्टीबद्दल चॅटिंग करीत असे. नंतर हळूहळू जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असे. ज्या मुली जाळ्यात येत नाहीत त्यांच्याबद्दल मॅनेजमेंटकडे  खोट्या तक्रारी करून काम बंद करीत असे. 


कोणतेही सबळ कारण नसताना कामावरून कमी केल्यामुळे राज्यातील किमान तीन ते चार रिपोर्टर मुलीनी  थेट मालकाकडे ईमेलव्दारे तक्रारी केल्या होत्या.त्यात मनमौज मोशीचे चॅटिंगचे स्किन शॉट जोडण्यात आले होते.'तू खूप सुंदर दिसतेस, तुला हा ड्रेस चांगला दिसतो' असे मनमौज मोशी म्हणत असे.  सततच्या तक्रारी नंतर मॅनेजमेंटने त्यावर एक समिती गठीत केली होती. त्यानंतर समितीने मनमौज मोशीचा राजीनामा घ्यावा अशी शिफारस केली होती. त्यामुळे मनमौज मोशीला अखेर राजीनामा द्यावा लागला आणि सर्व व्हाट्स अँप ग्रुप मधून लेफ्ट व्हावे लागले. 


 फक्त  फिल्डवरच नाही तर डेस्कवर काम करणाऱ्या महिला सहकार्याबद्दल रंगेल चाळे  करणारा मनमौज मोशीची विकेट पडल्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. बेरक्याने मनमौज मोशीचे रंगेल चाळे यापूर्वी प्रसिद्ध केल्यामुळे त्याचाही  परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. 

Post a Comment

0 Comments