टीआरपी घोटाळा: पुढील 8 ते 12 आठवड्यांसाठी न्यूज चॅनेल्सची साप्ताहित TRP यादी थांबवण्यात येणार




नवी दिल्ली  - मुंबई पोलिसांनी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP)  घोटाळा उघडकीस  आणला आहे. त्यामुळे तोंडावर पडलेल्या न्यूज चॅनल्सना अद्दल घडवण्यासाठी  पुढील 8 ते 12 आठवड्यांसाठी  न्यूज चॅनेल्सची साप्ताहित TRP यादीवर बंदी  घालण्यात येणार असल्याचे सूतोवाच  ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (BARC) ने केले आहे.  


पुढील 8-10 आठवड्यांसाठी टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट (TRP) वर बंदी घालण्यात येणार आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल (BARC)ने हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. काउंसिलची तांत्रिक कमिटी TRP जारी करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेणार आहे आणि व्हॅलिडेशननंतर ते पुन्हा सुरू केले जाणार आहे. दरम्यान रिपब्लिकसारख्या काही वाहिन्या पैसे देऊन टीआरपी वाढवतात मुंबई पोलिसांनी अलीकडेच असा दावा केला आहे.


काय आहे TRP?


कोणत्याही टीव्ही प्रोग्रामची लोकप्रियता आणि प्रेक्षकांची संख्या जाणून घेण्याचा टीआरपी हा मार्ग आहे. कोणता कार्यक्रम किती बघितला हे टीआरपीवरून समजते.


एखाद्या शोमध्ये टीआरपी जास्त असल्यास, याचा अर्थ असा आहे की लोकांना ते चॅनेल किंवा तो शो आवडतो. कोणत्या शोमध्ये जाहीरात देणे फायदेशीर होईल हे टीआरपीद्वारे जाहिरातदारांना समजते.


सोप्या शब्दात, टीआरपी सांगते की कोणत्या सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीवरुन किती लोक किती काळ चॅनेल पहात आहेत. हे एका तासात, एका दिवसात किंवा आठवड्याच्या काही वेळा असू शकते.


टीआरपीची गणना कशी केली जाते?


BARC ने सुमारे 45 हजार घरांमध्ये बार-ओ-मीटर किंवा पीपल मीटर डिव्हाइस बसवले आहेत. या मीटरने शोमध्ये एम्बेड केलेले वॉटरमार्क रेकॉर्ड केले आहेत.


BARC रिमोटमध्ये प्रत्येक घराच्या प्रत्येक सदस्यासाठी स्वतंत्र बटण असते. शो पाहताना त्यांना हे बटण दाबावे लागते. ज्याद्वारे एखादा शो परिवारातील कोणत्या सदस्याने किती वेळ पाहिला हे BARC ला समजते.


या आधारे, बीएआरसी स्पष्ट करते की 200 दशलक्ष टीव्ही पाहणार्‍या कुटुंबांमधील कार्यक्रम किंवा कार्यक्रम पाहण्याची पद्धत काय आहे किंवा 84 कोटी दर्शक काय पहात आहेत आणि किती वेळ कोणता कार्यक्रम पाहणे पसंत करतात.


या कुटुंबांना 2015 मध्ये नवीन ग्राहक वर्गीकरण प्रणाली (एनसीसीएस) अंतर्गत 12 विभागांमध्ये विभागले गेले आहे.यामध्ये, कुटुंबातील मुख्य कमाई करणार्‍या सदस्याच्या शिक्षणाच्या पातळीसह, घरोघरी वीज कनेक्शनपासून कारपर्यंत उपलब्धतेचा आधार बनवले जाते.


काय आहे नेमके प्रकरण?


मुंबई पोलिसांनी 8 ऑक्टोबर रोजी टीआरपी रॅकेटचा भांडाफोड केल्याचा पत्रकारपरिषदेत दावा केला होता. पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की, रिपब्लिक टीव्हीसह तीन चॅनेल पैसे देऊन टीआरपी विकत घेत होते. याप्रकरणी चौघांनी अटक करण्यात आली आहे. त्या चॅनेलशी संबधित लोकांना चौकशीसाठी बोलवले आहे. रिपब्लिकचे प्रमोटर आणि डायरेक्टरविरोधात चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान हे चॅनेल पैसे देऊन टीआरपी बदलत असल्याची कबुली अटकेतील चौघांनी दिली आहे. दुसरीकडे रिपब्लिक मीडिया नेटवर्कने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या