पुणे - पेड न्यूज देण्याच्या नादात दैनिक पुढारीने मोठी गंभीर चूक केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे दि. २४ जुलै २०२० रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. असे असताना त्यांच्या हस्ते दिवाळीनिमित्त दिव्यांग आणि वंचीत घटकातील व्यक्तींना आर्थिक मदत आणि वस्तूचे वाटप झाल्याची बातमी दैनिक पुढारी मध्ये ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली आहे. एखाद्या मृत व्यक्तीच्या हस्ते कार्यक्रम कसा काय होवू शकतो ? याबद्दल अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दैनिक पुढारीमध्ये चंदूकाका सराफ अँड सन्सची नेहमीच जाहिरात असते. जाहिरात वृत्त पेड स्वरुपयात देताना किमान नवीन बातमी देणे आवश्यक असताना गतवर्षी झालेल्या कार्यक्रमाची बातमी दैनिक पुढारीने ३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला ते ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांचे दि. २४ जुलै २०२० रोजी कोरोनामुळे निधन झाले आहे. निधनाच्या बातम्या दैनिक सकाळ, लोकमत आदी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या आहेत. पण पुढारीचे डोळे झाकलेले दिसत आहेत. डोळस पुणेकर वाचक मग कसे गप्प बसणार ? यामुळे दैनिक पुढारीची ही बातमी ट्रोल होत आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड यांच्या निधनाच्या बातम्या लिंक
https://www.esakal.com/pune/senior-lawyer-bhaskarrao-awhad-passes-away-pune-325281
0 टिप्पण्या