मानबिंदूची सोलापूर आवृत्ती 'लगाव बत्ती'मुळे झाली ' बुजाव बत्ती' !

मानबिंदूच्याच्या सोलापूर आवृत्ती मध्ये लगाव बत्तीची मनमानी सुरू आहे. सुरुवातीला सोलापूर ला बदली झाल्यावर त्यांनी जिल्ह्यातील सर्व उपसंपादक आणि तालुका प्रतिनिधी यांचे  राजकीय वार्ता पत्र छापणे बंद केले आणि याच लोकांकडून राजकीय माहिती घेत मानबिंदूच्याच्या स्टेटसला न शोभणारे लगाव बत्तीच्या नावाखाली लेखन सुरू केले. जिल्ह्यातील सर्व वार्ताहराना ही बातमी शेअर करायला लावून माझी लगाव बत्ती किती लोकप्रिय आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला.मात्र आता वरिष्ठांनी ही लगाव बत्ती बंद केली आहे.


हे लगाव बत्ती महाशय जिथे काम करतात तिथे ते सहकाऱ्यांना दाबण्याचे काम करतात. त्यांच्या बायलाईन बातम्या घेत नाहीत. त्यामुळे त्यांचे कुणाशीच पटत नाही. सध्या आवृत्ती मधील सर्व टीम त्यांच्यवर नाराज आहे. अनेक उपसंपादक आणि वार्ताहर यांच्या विषयी त्यांच्या मनात अडी असून त्याना त्यांचे काम चांगले असताना सापत्न वागणूक देऊन त्याना त्रास देत आहेत. उलट त्याना जे वार्ताहर त्यांच्या पुढे पुढे करतात. त्यांचे कौतुक करतात अशांच्या बातम्या ते रंगवून आणि मोठ्या करून लावतात. तसेच मागील पंधरा दिवसात त्यानी एकाच अंकात डबल बातम्या लावण्याचे प्रताप केले आहेत. त्यांच्या खुनशी स्वभावामुळे अनेक वार्ताहर दुखावले गेले आहेत. याचा निश्चित मानबिंदूलाला फटका बसत  आहे.


मागील काही दिवसात त्याने अशाच एका जुन्या उपसंपादक कम वार्ताहर असलेल्याला कमी करण्याचा प्रस्ताव मुख्यालयात पाठवला मात्र तो नामंजूर होऊन आल्याने या लगाव बत्तीला तोंडावर पडावे लागले. ज्या तालुक्यात मानबिंदूचे चे चांगले चालले आहे. ते डिस्टर्ब करायचे उद्योग सुरू केले आहेत. जे वार्ताहर हप्ते घेतात त्यांच्या पुढे पुढे करतात त्याना मात्र हे उचलून धरतात हे अक्कलकोटच्या वाळू तस्करी प्रकरणात दिसून आले. हा वार्ताहर जुन्या संपदकांनी कमी केला होता. मात्र यांनी त्याला पुन्हा घेऊन लिफ्ट दिली होती.


लगाव बत्ती सोलापूरला आल्याने अंकाची गुणवत्ता सुधारली नाही, की मानबिंदूची  पत वाढली नाही. अंक ही वाढ नाही आणि बिझनेस ही वाढ नाही. दिवाळी झाली तरी अद्याप अंक प्रसिद्ध नाही. वार्ताहरांना कमी करण्याच्या धमक्या देऊन ही बिझनेस झाला नाही.त्यामुळे मानबिंदूला 'बुजाव बत्ती' होण्याची वेळ आली आहे.  

 
Post a Comment

0 Comments