मुंबई - राहा एक पाऊल पुढे म्हणणाऱ्या झी २४ तास मध्ये निलेश खरे मुख्य संपादक म्हणून जॉईन होणार असल्याचे कळताच संपादक आशिष जाधव यांनी राजीनामा दिला आहे.आपणच बॉस नाही तर बस्स म्हणत आशिष जाधव यांनी घरचा रस्ता धरला आहे.
निलेश खरे यांनी सकाळ माध्यम समूहाच्या साम चॅनलचा राजीनामा दिल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून मीडियात सुरु होती. अफवा की सत्य अशी चर्चा सुरु असताना खरेनी खरंच सामचा राजीनामा दिला असून, झी २४ तास मध्ये मुख्य संपादक म्हणून त्यांची वर्णी लागली आहे.
इकडे झी तास मध्ये निलेश खरे बॉस म्हणून येणार असल्याचे कळताच संपादक आशिष जाधव यांनी राजीनामा दिला आहे. खरे उद्या किंवा परवा झी २४ तासची सूत्रे हाती घेणार असल्याचे वृत्त आहे.
साममध्ये नेस्ट कोण ?
निलेश खरे झी २४ तास मध्ये गेल्यामुळे साम चॅनल मध्ये संपादक म्हणून कोण येणार, याबाबत औत्सुक्य निर्माण झाले आहे. दरम्यान सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक राहुल गडपाले आणि संदीप काळे यांच्याकडे तात्पुर्ती सूत्रे देण्यात आली आहेत.
आशिष जाधव.,उदय निरगुडकर, मंदार फणसे ,माणिक मुंडे आदी सामच्या संपादक पदासाठी इच्छूक आहेत.
1 टिप्पण्या
ते अर्नव गोस्वामी च बघा की काही तरी... एवढा महाराष्ट्र द्वेष का आहे त्यांना...
उत्तर द्याहटवा