कोणत्या पत्रकारांना लाभ मिळणार ?
नगर - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकरांच्या चार चाकी वाहनाला टोलमाफी मिळेल, तसेच रस्ता अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबाला पाच लाख रुपये मिळतील, अशी अशी घोषणा केली आहे.दैनिक नवराष्ट्रने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे.
या घोषणेचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी स्वागत केले असून, आमच्या आंदोलनाला यश आल्याची भावना व्यक्त केली आहे.
केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकार असो, मंत्री पत्रकारांच्या हिताच्या बाबत घोषणा करतात , मात्र या घोषणा हवेतच विरून जातात. या घोषणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. शासन स्तरावरून त्याचा आदेश निघत नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील काळात देखील असेच सूचक वक्तव्य करून आपले कार्यालयपत्र तोलमाफी साठी पत्रकार संघ यांना दिले . ते पत्र अनेक ठिकाणी व्हायरल पण झाले त्याची कार्यवाही झाली नाही . याबाबत राज्यातील एक पत्रकार शिष्टमंडळाने नुकतीच दिल्ली येथे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत गडकरी यांना भेटले, त्यावेळी त्यांनी अधिस्वीकृतीधारक नव्हे तर संपूर्ण व पत्रकारांना टोलमाफी करू व रस्त्यावर अपघात झाल्यास पाच लाख रुपयांचे विमा कवच घेऊन अशी जाहीर केले तर राज्याचे आरोग्य मंत्री नामदार राजेश टोपे यांनी देखील कोरोना कालामध्ये पत्रकारांना मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लक्ष रुपयांचे विमा कवच दिले जाईल असे सांगितले होते.
मात्र त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी झाली नाही, अनेक वेळा याबाबत संबंधित महा विकास आघाडीतील मंत्र्यांना याबाबत अनेक संघटनांनी विचारणा केली तरी कोणतीही कारवाई होत नाही, त्यामुळे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून एक प्रकारे केंद्र व राज्यातील मंत्र्यांकडून पत्रकारांची चेष्टा केली जाते काय असा सवाल देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी व्यक्त केला होता.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून,ओळखला जातो.या पत्रकाराला त्याची सेवा बजावत असताना वारंवार राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो.त्यामुळे पत्रकारांना टोल माफी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती,
.महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुणे येथील एका कार्यक्रमामध्ये पत्रकार बांधवांना टोल माफी मिळावी यासाठी टोल माफीची मागणी निवेदना द्व्यारे रस्ते वाहतूक मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.याचंच फळ म्हणून आज या केलेल्या टोल माफीच्या मागणीस अनुसरून गडकरी यांनी संपूर्ण राज्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या टोलनाक्यांवर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना टोलमाफी, त्याचप्रमाणे या महामार्गावरून प्रवास करताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास विमा कवच देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
कोणत्या पत्रकारांना लाभ मिळणार ?
जे अधिकृतीधारक पत्रकार आहेत आणि ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे, त्याच वाहनाला ( तेही एका ) टोलमाफी मिळणार , अशी शक्यता गृहीत धरली जात आहे. तसेच ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे, तेही नक्कीच इन्कम टॅक्स भरणार हे गृहीत धरले तर त्यांना राज्य शासनाची पेन्शन योजना लागू होणार का ? हे एक कोडेच आहे.
0 टिप्पण्या