खांडेकर , स्वतःच्या कर्मचाऱ्याकडे जरा "उघडा डोळे, बघा नीट"



वर्षभरात कोरोनामुळे आपण आप्तस्वकीयना गमावलय.  मिडियातले काही सहकारी सुद्धा आपण गमावले.. आपण पॅशन म्हणून काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी घेणं हे कंपनीच काम आहे . पण एबीपी माझा मध्ये जीवघेणी दुसरी लाट येऊन सुद्धा काहीही काळजी घेतली जात नाहीये.


 या सगळ्या काळात कर्मचाऱ्यांची संख्या कमी ठेवण्या ऐवजी सगळ्यांना बोलावलं जातंय. जबरदस्ती 9 ते 10  तास काम करून घेतलं जातंय. त्याबदल्यात या कोरोनाकाळात तरी कामाच्या तासानुसार आठवड्यातून  2 तरी विक ऑफ देणं आवश्यक आहे.  कंपनीची नियमावली हेच सांगते. पण जिथे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा आणि ताणाचा प्रश्न येतो तिथे कँपणीचे नियम बाजूला ठेऊन राबवून घेतलं जातंय. 


 कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचाही विचार केला जात नाहीये.   काम करण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही पण ऑफिस मध्ये जास्तीत जास्त थांबवून ठेवण्याची ही वेळ आहे का? कोणाला काही झालं तर ऑफिस जबाबदारी घेणार का.(अनेकवेळा कंपनीने हात वर केले आहेत) जेव्हा चॅनल म्हणून आपण लोकांना काळजी घेण्याच आवाहन करतो तेव्हा चॅनलच आपल्या कर्मचार्यांसोबत इतक्या असंवेदनशिल्पने वागत असेल तर काय करायचं.... 


आऊटपुटच्या एक व्यक्तीला कोरोना झाला तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणालाही क्वारंटाईन करण्यात आलं नाही. तसच ही माहिती पण लपवून ठेवण्यात आली. त्यानंतर ऑफिसमध्ये एका कॅमेरामनचा कोरोना रिपोर्ट पोजिटीव्ह येऊन सुद्धा ते ऑफिसमध्ये अनेकांच्या संपर्कात आले .


एक महिला अँकरला ऑफिसमध्ये बातमीपत्र केल्यावर श्वासाचा त्रास झाला. नंतर त्यांनाही कोरोना असल्याचं लक्षात आलं. तेव्हाही संपर्कात आलेल्यांना आयसोलेट करण्यात आलं नाही.


काही दिवसांनी एक पुरुष अँकर ऑफिस मध्ये आला तेव्हाच त्यांना लक्षण जाणवत होती. संपूर्ण न्यूजरूम मध्ये त्यांचा वावर होता. टेस्ट केल्यावर त्यालाही लागण झाल्याच कळलं. ही बाब सुद्धा सांगण्यात आली नाही. 2 दिवसानंतर ते समजलं नेहमीप्रमाणे संपर्कात आलेल्या कोणालाही क्कवारंटाईन करण्यात आलं नाही. 


आज घरात आमचे वयोवृद्ध आई वडील आहेत, लहान मूल आहेत . ऑफिस मध्ये कुठलीही काळजी घेण्यात येत नाही . पण पोटाचा प्रश्न असल्यामुळे यावं लागत. पण  उद्या मी ऑफिसमधून घरी गेल्यावर माझ्या कुटुंबियांना काही झालं तर याला जबाबदार कोण...  कोरोनाची लागन कोण्या सहकार्याला झाली तर ही बाब गुप्त का ठेवली जातेय. त्या ऐवजी सांगितलं तर घरी जाताना आणि गेल्यावर काळजी तरी घेता येईल.


एकत्र आमच्या जीवाशी खेळलं जातंय, काळजी घेतली जात नाहीये, जबाबदारी घेतली जात नाहीये, हक्काच्या सुट्या आणि विक ऑफ नाकारले जात आहेत. म्हणजे आमच्या जिवापेक्षा कोणाचा हट्ट आणि इगो महत्वाचा आहे का? गेल्या 6 वर्षात पहिल्यांदा एबीपीत कर्मचाऱ्यांना इतकं वाईट पद्धतीने वागवलं आणि राबवल जातंय....


आम्हाला लक्षण आणि इतर त्रास जाणवत असताना सुद्धा ऑफिसमध्ये बोलावलं जातंय, डेस्क वर बसून तासन तास काम याही स्थितीत करून घेतलं जातंय...  शिफ्ट पेक्षाही जास्त वेळ थांबवलं जातंय.. शिफ्ट च्या आधी बोलावलं जातंय...   हा त्रास सगळ्यांनाच होतोय.. सगळे खूप अस्वस्थ आहेत पण कोणाची बोलण्याची हिम्मत होत नाहीये..


आवडीने आम्ही पत्रकार झालो असलो तरी आमच्या जीवाची एक किंमत आहे ती केली जात नाहीये..  एकेकाळी वडिलांसारखी काळजी घेणारे संपादक सुद्धा आता इतके असंवेदनशील का झाले हा प्रश्न जास्त अस्वस्थ करतोय. घरीबसून काम करणारे एच आर पण याकडे  दुर्लक्ष करताय. 


( एबीपीमध्ये काम करणारा एक पत्रकार)


Post a Comment

0 Comments