औरंगाबाद - कोरोना महामारीमुळे लोकमतचे कंबरडे मोडले आहेत. सर्वच ठिकाणी खप प्रचंड घरसला आहे. त्यामुळे लोकमत माध्यम समूहाने G -2 नावाची कंपनी स्थापन करून Snacks विक्री सुरु केली आहे.
या Snacks मध्ये सेव (शेव), चिवडा, लाडू, फरसाण, बटाटा वेफर्स, कुरकुरे,दाळ, चकली, भडंग याचा समावेश आहे.या Snacks विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात डिस्ट्रीब्यूटर नेमण्यात आला आहे.
दैनिक लोकमतमध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. भविष्यात वृत्तपत्र एजंट आणि वार्ताहरांना लोकमत बरोबर Snacks विक्री करावी लागणार की काय ? अशी भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या तरी लोकमत कर्मचाऱ्यांना " घ्या हो घ्या, चिवडा घ्या... गरम मसालेदार चिवडा घ्या, म्हणण्याची वेळ आली आहे.
लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांचे चिरंजीव ऋषी दर्डा यांच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया निघाली आहे. लोकमत आता कोणकोणत्या क्षेत्रातून पाऊल ठेवणार ? याकडं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, पुण्यनगरी वृत्तपत्राने औरंगाबाद मध्ये मिनरल वॉटर प्लांट व्यवसाय सुरु केला असून, "पुण्य ॲक्वा" नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री सुरु केली आहे.
0 टिप्पण्या