मानबिंदूने वडापावच्या दरवाढीस फोडली वाचा; नव्या वळणावर शोध पत्रकारिता ?


कोल्हापूर - मानबिंदूने कोल्हापूर आवृत्ती अंतर्गत पाच जिल्ह्यांत वरिष्ठ पत्रकारांकडून मोठे संशोधन करून गरिबांचा बर्गर समाजला जाणाऱ्या वडापावच्या दरवाढीच्या विषयाला वाचा फोडली आहे. त्यामुळे मानबिंदूंच्या कोल्हापूर आवृत्तीला झालंय तरी काय? असे विचारण्याची वेळ वाचकांवर आली आहे. कोल्हापूर आवृत्तीने शोध पत्रकारितेची व्याख्याच बदलली असून कार्यालयात बसून मोठ्या प्रमाणात टेबल न्यूज दिल्या जात आहेत. एकच बातमी डेटलाईन/बायलाईन बदलून वेगवेगळ्या जिल्ह्यात वापरल्या जात आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे.  


मानबिंदूला बातम्या मिळत नाहीत म्हणून हा प्रकार सुरू आहे का? अशी चर्चा आहे. एकतर ग्रामीण भागातील वार्ताहर अत्यल्प मानधनावर काम करतात. बातम्या लागत नाहीत अशी त्यांची तक्रार असते. मात्र त्यांना न्याय देण्याऐवजी टेबल न्यूजचा कारभार सुरू आहे. यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, हाही शोध पत्रकारितेचा विषय आहे.  


मानबिंदूच्या हॅलो कोल्हापूर, हॅलो सांगली, हॅलो सातारा, हॅलो रत्नागिरी व हॅलो सिंधुदुर्ग आवृत्तीला वरिष्ठ पत्रकारांकडून मोठा अभ्यास आणि संशोधन करून गरिबांचा बर्गर समाजल्या जाणाऱ्या वडापावच्या दरवाढीच्या विषयाला वाचा फोडली आहे. खरेतर हे विशेष वृत्त म्हणजे कॉपी पेस्टचा प्रकार आहे. चौकटीत वापरलेला मजकूर एकसारखाच आहे. तर लोकांच्या प्रतिक्रियेत फक्त नावे बदलली आहेत. 
Post a Comment

0 Comments