ही घाण कोणी निस्तरायची ?

(भाग-१६)

पत्रकार पाकिटे,बक्षिसी,बिदागी घेतात.लाच घेतात,बातम्या देण्याच्या किंवा लपवण्याचा सुपाऱ्याही घेतात.हे आता जगजाहीर सत्य आहे.नाक दाबून पाद झाकत नसतो.यात तो मी नव्हेच,किंवा मी नाही त्यातला असे म्हणणारच खरा चोर असतो हेही शाश्वत सत्य आहे.आजकाल तर डिजिटल मीडियावर सुशील कुलकर्णी,अनिल थत्ते,भाऊ तोरसेकर,अनय जोगळेकर,या सारखे काही युट्युबर्स चक्क भाजपची.म्हणण्यापेक्षा फडणवीसांचीच   भजने,पोवाडे,कव्वाल्या गाऊन पोट भरीत आहेत.(बिच्चारे !) या भिकेच्या डोहाळ जेवणाचे जाऊद्या,कुठल्या एका मराठी सिनेमात लावणी आहे बघा 'पोटा साठी नाचते..पर्वा कोणाची ?' त्यामुळे वर सांगितलेले शाहीर-सोंगाडे आपल्या प्रबोधनाला काय दाद देणार.असं रस्त्यावर मुतू नका म्हणून सांगायला गेलं तर ते म्हणतील 'तुम्हाला काय करायचं ? आम्ही रिंगण घालू ?' बरे त्यांची तक्रार करायला कुठे जागाच नाही.हे आता 'देवाला' सोडलेले आहेत.बरे पत्रकारितेतल्या जेष्ठांना सांगावे म्हटले तर बहुतेक जेष्ठांना बड्या बड्या वर्तमानपत्रांनी स्वेच्छा किंवा सक्तीची निवृत्ती देऊन घरी बसवलंय.काही स्वतःच्या हातगुण-पायगुणांनी बाहेर आहेत.जे थोडेफार आत आहेत त्यांच्या मुसक्या आवळलेल्या किंवा त्यांनी स्वतः मुंगसे अडकवलेली.ते काय बोलणार ? शिवाय तेच गच्चीवरून मुततात.त्यांना या रिंगनबाजांना अनुभवाचे बोल किंवा पत्रकारितेचे सिद्धांत सांगण्याचा अधिकार आहेच कुठे.


पत्रकारितेतली गुन्हेगारी कुठवर पोहचलाय बघा.खंडण्या वसूल करण्यापर्यंत पत्रकारांची मजल पोहचली आहे.ही काही नवी एक्सलीजिव्ह बातमी नाही.नांदेड-हिंगोली-परभणी जिल्ह्यात घडलेल्या रेशन धान्य घोटाळ्यात एक दोन नाही १७ पत्रकार अडकलेत.महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांचे.या शिवाय वाळू तस्करीपासून सरकारी कंत्राटदारी आणि विविध खात्यांच्या अधिकाऱ्याकडून पत्रकार खंडण्या हप्ते घेतातच.राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी -कार्यकर्ते,माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार.हे सरसगट  नाही पण एकजात खंडणीखोर-हप्तेबाज बनलेत.


परवा पुण्यातल्या व्यावसायिकाना ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या तीन पत्रकारांना पुणे पोलिसांनी लाच घेताना रंगेहात पकडले.यातला मुख्य आरोपी सम्यक संपादक पत्रकार संघाचा अध्यक्ष आहे.नाव :सुहास मारोती बनसोडे.दुसरा मोईन चौधरी आणि तिसरा वसीम शेख.एका गॅस एजन्सीकडून हे तिघे खंडणी उकळताना पकडण्यात आले.हा त्यांचा पहिलाच अपराध नक्कीच नसेल.


दुसरे प्रकरण DJIPR चे आहे.पुण्यातली सम्यक प्रकरण हि चिंधीचोर भामटेगिरी असेल तर  DJIPR  प्रकरण पंचतारांकित भामटेगिरी आहे.राजकारण,उद्योग,प्रिंट आणि इलेक्टॉनिक मीडिया,सिनेमा मॉडेलिंग,मार्केटिंग,जाहिरात,अशा क्षेत्रात वावरणाऱ्या बड्या हस्तीशी किंवा बकऱ्यांशी संबंध असणारे उच्च्भ्रू सेलिब्रेटी वर्तुळात वावरणारी एक पत्रकारांची जमात असते.अर्थात केवळ त्या वर्तुळात ओढले गेले किंवा घुसले म्हणून ते तेथे असतात.कोट-जाकिटे,इम्पोर्टेट कपडे घालतात इतकेच.आतून ते अजागळच असतात.अशा बुभुक्षित आशाळभूत पत्रकारांचा एक समूह कायम उपरोल्लेखित उच्चभू वर्तुळातून काही ना काही तुकडाफेक लाभ मिळवत असतो.


एकूणच आजची पत्रकारिता आणि पत्रकार वरपासून खालपर्यंत अवनतीच्या चिखलात बरबटून गेली असल्याने उडदामाजी काळे गोरे शोधायचे तरी कसे असा सवाल आहे.तरी आपण प्रयत्न सुरु ठेवू.किमान सांगू तरी कुठे कुठे काय काय किती फाटले आहे.

(क्रमशः )

उद्या वाचा : डिजिटल टीआरपीची गटारगंगा

-रवींद्र तहकिक

7888030472

Post a Comment

1 Comments

  1. राणेच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे फासुन धुतलं म्हणे... बरंय का आता...?

    ReplyDelete