मराठी पत्रकारितेला मालकशाहीचे गुलाम बनवणारे खोजे ...


भाग - १०


मराठी पत्रकारितेला आज जे बेंगरूळ,भाकड,वांझोटे,षंढ,भ्याड,भेकड,वेठबिगारी आणि गुलामगिरीचे,स्वरूप आलेले आहे.त्याची सुरवात साधारणतः सत्तरच्या दशकात झाली.मी वरती जी विशेषणे वापरली ती हातची राखून वापरली आहेत.प्रत्यक्षात परिस्थिती याहून वाईट आहे.दलाली,भडवेगिरी,भीखमांगेगिरी काय करायचं ठेवलंय.पत्रकार हप्तेखोरी करतात.ब्लॅक मेलिंग करतात.खंडणीखोरी करतात.हनी ट्रॅप चालवतात.चोऱ्या आणि फसवणूक करतात.लैंगिक शोषण आणि बलात्कार करतात, खुनाच्या सुपाऱ्या देतात.सन्मानीय अपवाद भरपूर आहेत.पण गुन्हेगारही कमी नाहीत.किंबहुना गुन्हेगारच अधिक आहेत.यात काही भुरटे-चिंधीचोरही आहेत.ज्यांना मोठे डाके दरोडे टाकता येत नाहीत ते चिल्लर उचापती करतात.पाकिटबाजी तर चालूच आहे.



   एक काळ होता जेव्हा पत्रकारांना समाजात किंमत होती.प्रतिष्ठा आणि आदर-सन्मान होता.शब्दाला मान होता.पत-ऐपत होती. दहशत भीती नाही पण दरारा होता.पत्रकार म्हणजे निर्भीड,परखड,सत्यवादी,न्यायासाठी लढणारा अशी ओळख होती.सगळ्या सरकारी खात्यांचे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी ,संबंध पोलीस खाते,लोकप्रतिनिधी,आमदार-खासदार,मंत्री.इतकेच काय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान सुद्धा टरकायचे पत्रकारांना.मी खूप जुना इतिहास नाही सांगत.म्हणजे टिळकांची-आगरकरांची पत्रकारिता वगैरे.त्यांचे विषय-प्रश्न वेगळे होते.अगदी प्रबोधनकार ठाकरे किंवा अनंतराव भालेराव,सुधाकर डोईफोडे वगैरेही सोडून देऊ.म्हणजे त्यांची उज्ज्वल पत्रकारिता महत्वाची आहेच.पण मला खासकरून उल्लेख करायचाय तो आचार्य अत्रे,नीलकंठ खाडिलकर आणि बाळासाहेब ठाकरेंचा.हे स्वातंत्र्यानंतरचे,खऱ्या अर्थाने सामाजिक किंवा लोकशाहीतली राजकीय पत्रकारिता सुरु झाल्या नंतरचे पत्रकार.काय दरारा होता यांच्या लेखणीचा.आठवा जरा.ज्यांना माहित नाही त्यांनी माहित करून घ्या.जुने संदर्भ तपासा.वाचा.


दिल्लीचे सरकार आणि पंतप्रधान हादरवून टाकायचे हे लोक.मुख्यमंत्री मंत्री आमदार खासदार किंवा सनदी अधिकारी,पोलीस सोडाच.एखाद्या सनदी अधिकाऱ्याला नाही मिळायचा तेवढा सन्मान.फक्त आदरतिथ्य नाही,शब्दाला आणि सूचनेला किंमत होती.पत्रकारांच्या प्रश्नाला थातुरमातुर उडवा उडवीचे उत्तरे देण्याची कोणाची हिम्मत नव्हती,आज काय परिस्थिती आहे ? तुम्ही हातभट्टी,प्लॉटिंग किंवा वाळूच्या धंद्यातील तस्कर असलेल्या,एखादा बियर बार ढाबा असणाऱ्या कुठल्यातरी छपरी संघटनेचा फटीचर कार्यकर्ता असणाऱ्या पक्षनिधी किंवा खंडण्या वर्गण्या उकळून जमलेल्या पैशानी नगरसेवकाची निवडणूक जिंकलेल्या डुकरांचे पाय चाटता ? सगळेच नाही पण बहुतांश.हे टोकाचे उदाहरण झाले.ज्याची जशी औकात तसे त्याला पाय.ही परिस्थिती आर्थिक कारणांनी नाही तर वैचारिक दळभद्रीपणामुळे आहे.नैतिक अध :पतनामुळे आहे.


कोरोना काळात किती मालकशहांनी किती पत्रकारांना नोकरीवरून कमी केले.माझ्या माहिती प्रमाणे किमान ३ ते ४ हजार तरी पत्रकार कोरोनात बेकार झाले.अनेकांचे पगार कापले.अनेकांना निवृत्त केले ते वेगळेच.कोरोनात मेले त्यांना कोणत्या पेपरने किंवा न्यूज चॅनलने मदत केली ? एका तरी सन्माननीय आजी माजी (पाजी ) संपादकाचे दाभाड उचकटले का त्या विरोधात.जाहीर जाऊद्या,खाजगीत,सोशल मीडियावर किंवा ब्लॉग-युट्युबवर तरी.नाही ना ? हिम्मतच नाही.तुमच्या पेक्षा तृतीयपंथी बरे.ते अन्याय झाल्यावर एकत्र येतात,भिडतात.लढतात.आंदोलन करतात.तुम्ही आपले आपापल्या पँटीतले उंदीर पिटाळण्यात गुंग .शेजारच्यांनी तिरडी उठलेली पहायला वेळ आहे कोणाला ? (सन्माननीय अपवाद वगळता)एखादे उदाहरण सांगा ? पत्रकारांना एखाद्या वेठबिगारासारखे वागवले जाते.केव्हाही नोकरीवरून काढले जाते.पगार बुडवले जातात.जे नोकरीवर राबतात त्यांना तुटपुंजे पगार.ही सगळी दंडेलशाही आणि गुलामगिरी का आणि कशी निर्माण झाली.मी पुन्हा पुन्हा सन्माननीय अपवाद म्हणतोय खरा.पण त्यांना शोधायचे कुठे ? कोणी म्हणेल लेख जरा मूळ विषयापासून भरकटलाय,नाही आजिबात नाही.मी पुन्हा तोच प्रश्न विचारतोय.खरेच पत्रकार म्हणून समाजात आपली असायला हवी ती इभ्रत आहे का ? कामाच्या ठिकाणी असायला हवा तो सन्मान आहे का ? कामाचे स्वातंत्र्य आहे का ? सगळ्यात महत्वाचे पत्रकारांना असायला हवे तितके मानधन वेतन मिळते का ? (निवृत्ती वेतनाची बातच सोडा ) पहा जरा भोवताली काय स्थिती आहे.


जनतेचा आवाज,लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण पत्रकार.आपल्याच मुस्कटदाबी विरुद्ध कुरकुरसुद्धा करू शकत नाही.कशाला झक मारायला स्वतःला पत्रकार म्हणवता रे ? (सन्माननीय अपवाद वगळता) मी सविस्तर लिहिणार आहे पुढच्या भागात.पत्रकारावर ही वेळ कोणी कोणी आणली त्यांची नावासह चिरफाड करणार आहे.पत्रकारांची किंमत कवडीमोल करणारे आद्य गुलाम आहेत माधव गडकरी,माधव गोडबोले,कुमार केतकर,विद्याधर गोखले,बाबा दळवी,भारत कुमार राऊत.आणखीही बरेच आहेत.पण हे जरा ठळक.मराठी पत्रकारितेला भांडवलदारांची बटीक आणि राजकीय पक्ष पुढाऱ्यांची गुलाम बनवणारे हे आहेत खोजे.खोजे म्हणजे काय ते माहित नसेल तर सांगतो.मोगलाईत बादशहा असो की एखादा छोटा मोठा सरदार.त्याच्याकडे त्याच्या ऐपतीनुसार जनानखाना असे.या जनानखान्यात लग्नाच्या,पळवून आणलेल्या,ठेवलेल्या अशा बायका असत.त्यांची संख्या २०० -३०० ते ५ हजारापर्यंतही असे.बादशहा तर या सगळ्या बायांची नियमित लैंगिक संबंध ठेऊ शकत नसे.मग त्यांनी काही दुराचार करू नयेत म्हणूनत्यांची राखण कोणी करायची ? तर त्यासाठी खोजे ठेवले जात.खोजे म्हणजे मुद्दामहून नपुसक केलेले (बैलाप्रमाणे वृषण ठेचलेले ) बलदंड पुरुष.ते षंढ नसत पण त्यांच्यात पुरूषत्वही नसे.असे हे उपरोल्लेखित खोजे.त्यांनी वर्तमानपत्रांचे अक्षरशः जनानखाने केले. सन्माननीय अपवाद वगळता !

(क्रमशः )

उद्या वाचा : आरोपी क्रमांक एक -कुमार केतकर

-रवींद्र तहकिक

7888030472

!--Composite Start-->

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. #खोजे...

    सर, तुम्ही तर चांगलीच ठासली राव.
    जे काही खोजे आहेत त्यांना आता पळता भुई थोडी होईल अन् पितळ उघडं पडल्याने आता लपवता येणार नाही...

    उत्तर द्याहटवा