डिजिटलमध्ये महाराष्ट्र टाइम्स नंबर १

एबीपी माझा खालून पहिला 


वेबसाइटवरील बातम्यांचा दर्जा घसरला 


मुंबई - सध्या मराठी न्यूज चॅनलचा टीआरपी बंद असला तरी वेबसाईटच्या  रँकिंगसाठी डिजिटलमध्ये चढाओढ लागली आहे. महाराष्ट्र टाइम्सची वेबसाईट नंबर १ वर आहे तर न्यूज १८ लोकमत नंबर २ आणि लोकमतची वेबसाईट नंबर ३ वर आहे. एबीपी माझा खालून पहिला आहे. 


आपल्या वेबसाईटचा युझर किती आहे  ? हे  तपासण्यासाठी कॉमस्कोअर comscore नावाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. कॉमस्कोअर comscore ही एक अमेरिकन मीडिया मापन आणि विश्लेषक कंपनी आहे जे विपणनासाठी डेटा आणि व्यवसायांना विश्लेषण प्रदान करते; मीडिया आणि जाहिरात एजन्सी आहे 


या संस्थेची नोंदणी फी वर्षाला किमान १५ लाख आहे. न्यूज पेपर, न्यूज चॅनल नंतर आता न्यूज पोर्टलवर जाहिरात मिळावी यासाठी कॉमस्कोअरची रँकिंग महत्वाची ठरले. जाहिरात देणाऱ्या कंपन्या कॉमस्कोअर comscore चा रँकिंग रिपोर्ट पाहूनच जाहिराती देतात, त्यामुळे आता न्यूज पोर्टल म्हणजे वेबसाईटचा युझर वाढण्यासाठी चढाओढ लागली आहे. 


 # दर महिन्याला  २५ ऑगस्ट रोजी  मागील महिन्याचा वेबसाईटचा रँकिंग जाहीर केला जातो. 

# मराठी वेबसाईटसची जुलै महिन्यातील कॉमस्कोअर रँकिंग

( ही आकडेवारी मिलियनमध्ये आणि युझर किती आहे, याची आहे ) 


  1. महाराष्ट्र टाईम्स 20.5
  2. न्यूज १८ लोकमत 17.8
  3.  लोकमत 17.1
  4.  झी २४ तास 15.1
  5. लोकसत्ता 13.7
  6. टीव्ही ९ मराठी 13.6
  7. ईसकाळ 9.4
  8.  एबीपी माझा 6.8


वेबसाइटवरील बातम्यांचा दर्जा घसरला 

वेबसाईटचा युजर वाढण्यासाठी टीव्ही ९ मराठी , लोकमत, न्यूज १८,  लोकमत, झी २४, लोकसता या वेबसाईट सेक्सविषयक बातम्याना आग्रक्रम  देत असल्याचे दिसून येत आहे. 


युनिक कंटेन्ट न देता अश्लील आणि सेक्स विषयक सर्वाधिक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने सोशल मीडियावर पत्रकारांची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. फेसबुक पेज, ट्विटरवर बातम्यांच्या लिंकखाली खूप वाईट पद्धतीच्या कमेंट दिल्या जात आहेत. अनेक वेबसाईटनी पत्रकारांची लाज आणली आहे. यामुळेच लोकांचा पत्रकारितेवरील विश्वास संपत चालला आहे. 


TRP इतकीच  Ranking संशयास्पद

TRP इतकीच इतर Ranking बाबत संशयास्पद स्थिती आहे. त्यातही Comscore, Alexa, Similar Web, Google, Microsoft असे अनेक प्लेअर्स आहेत. त्यांचे वेगवेगळे पॅरामीटर आणि ट्रॅफिक एनालीसिस टूल्स आहेत. 

Times Internet च्या एका लेखात या साऱ्याचा आढावा आणि विश्लेषणात, हे सारे थर्ड पार्टी टूल्स घातक असून "फेक न्यूज"इतकेच अविश्वार्साह, बनावट असल्याचे म्हटले होते. या लेखाच्या "क्लोजिंग नोट्स"मध्ये प्रकाशक संस्था आणि जाहिरातदार व सर्व संबंधितांनी एकत्र येऊन "मेट्रिक्स आणि प्लॅटफॉर्म"संदर्भात तातडीने एक "इंडिपेंडंट ऑडिटर" व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहन केले होते. विशेष म्हणजे हा ऑडिटर ही कोणतीही मेझरमेंट कंपनी नको, अशी सूचनाही त्यात होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या