पुणे - दैनिक लोकमतला पुणे आवृत्तीसाठी संपादक हवा आहे. त्यासाठी आज लोकमतमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुण्यात संपादकांचा वानवा आहे का ? हे यानिमित्त चर्चिले जात आहे.
कोरोनामुळे लोकमतचे पुण्यात कंबरडे मोडले आहे. खप प्रचंड घसरला आहे. त्यात संपादक प्रशांत दीक्षित या महिना अखेर निवृत्त होत आहेत. त्यामुळे लोकमतने संपादक पदासाठी चाचपणी सुरु केली आहे.
नागपूरमध्ये श्रीमंत माने आणि औरंगाबाद मध्ये नंदकिशोर पाटील यांनी काही दिवसापूर्वी संपादक पदाची सूत्रे घेतली. नाशिक, अकोला मध्ये फेरबदल करण्यात आले. आता पुण्यात लोकमतला संपादक हवा आहे. नियम आणि अटी पहा ...
0 टिप्पण्या