गणपतीबरोबर धनंजय लांबेची 'लोकमत' मध्ये प्रतिष्ठापना ...



औरंगाबाद - 'लोकमत' मध्ये आज गणपतीबरोबर धनंजय लांबेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. औरंगाबाद ब्युरो चीफ म्हणून लांबेची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र  लांबे फौजदारचे कॉन्स्टेबल कसे काय झाले  ? याचे आश्चर्य सर्वाना वाटत आहे. 


सामना, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी असे वर्तुळ पूर्ण करून लांबे यांनी लोकमतमध्ये आज पाऊल ठेवले आहे. दिव्य मराठी आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये ते निवासी संपादक तर पुढारीमध्ये  कार्यकारी संपादक होते. 


१ मार्च रोजी लांबे यांना 'पुढारी'तून नारळ देण्यात आल्यानंतर ते घरी बसून होते. सकाळसाठी त्यांनी प्रयत्न केले पण सकाळने त्यांना लांबच ठेवले. शेवटी तडजोड म्हणून लांबेनी  ब्युरो चीफ पदावर समाधान मानत लोकमतमध्ये एंट्री केली आहे. 


लोकमतमध्ये अनेक सिनियर रिपोर्टर असताना, काही दिवसापूर्वी ब्यूरी चीफ पदासाठी जाहिरात काढण्यात आली होती. याच जाहिरातीनुसार लांबेला घेण्यात आले आहे. मात्र लांबेमुळे जुने रिपोर्टर लोकमतपासून लांब गेले, हा भाग वेगळा. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या