LS मराठी' 24x7 न्यूज चॅनेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

अद्ययावत तंत्रज्ञान, फुल HD ग्राफिक्स आणि 36 जिल्ह्यांच्या बातम्यांसह 'LS मराठी' होणार On Air



प्रेक्षकांना 'सत्याची नवी दिशा दाखवणारं, बातम्यांची सखोलता गाठणारं आणि त्या वेगवानं रूपात देणारं मराठी न्यूज चॅनेल अर्थात, 'LS मराठी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला On Air स्वरूपात येत आहे. अद्ययावत सुसज्ज यंत्रणा आणि नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित ग्राफिक्ससह हे चॅनेल फुल HD क्वालिटी मध्ये प्रक्षेपित होणार आहे.

'LS मराठी' चा उद्देश फक्त बातमी देणे नसून 'बातमीमागची बातमी' प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. सखोल आणि परखड विश्लेषणामधून प्रत्येक घडामोडीचा खरा अर्थ समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे.

'LS मराठी' ची वैशिष्ट्ये

चॅनेलवर LIVE बुलेटिन आणि सुपरफास्ट बातम्या प्रेक्षकांना 24 तास उपलब्ध असतील. महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीसाठी खास 36 जिल्हे, 36 बातम्या हे बुलेटिन दररोज प्रसारित होणार आहे. त्यामुळे 'चांदा ते बांदा' प्रत्येक भागातील बातमी थेट घरपोच पोहोचेल.

केवळ राजकारणच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विद्यार्थी, शेतकरी, कामगार यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना 'LS मराठी' वर प्राधान्य दिले जाईल. देश-विदेश आणि वैश्विक घडामोडींचे अचूक आणि जलद अपडेट्सही येथे मिळतील.

दिग्गजांच्या मुलाखती आणि जनतेचा आवाज

विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या खास मुलाखती या चॅनेलचे आणखी एक आकर्षण असणार आहे. तसेच अन्याय, अत्याचाराविरोधात आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 'LS मराठी कटिबद्ध आहे.

'LS मराठी' मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी

'LS मराठी' चॅनेलसाठी विविध पदांवर भरती सुरू झाली आहे. Input Head, Output Head, Anchors, Social Media Handler आदी महत्त्वाची पदे भरावयाची आहेत. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी Resume सह अर्ज करावेत. नवीन विचार, नवी ऊर्जा घेऊन काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.

नवीन विचार, नवी ऊर्जा आणि नवी दिशा घेऊन येणाऱ्या `'LS मराठी चॅनेलसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या टीव्ही स्क्रीनवर 'LS मराठी' दिसणार आहे. 'सत्याचा शोध आणि बातमीचा वेग' हीच LS मराठी' ची खास ओळख असणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क

स्नेहल चौधरी

व्यवस्थापकीय संचालक

LS Marathi

9684808593



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या