'वाटी पत्रकार' झाला ठोकशाहीचा कार्यकारी संपादक ...



 मुंबई - ज्याला इलेक्ट्रॉनिक तथा टीव्ही मीडियाचं "ओ " की "ठो" कळत नाही, अश्या वाटी पत्रकारास ठोकशाहीचा कार्यकारी संपादक करण्यात आलं आहे, त्यामुळे चॅनल आणखी गाळात रुतले आहे. 


बेळगावच्या ठाकुरांची  मुंबईत अनेक वर्षे पीआरओशिप करणारा वाटी पत्रकार नंतर मानबिंदूमध्ये गेला खरा, पण आठच महिन्यात खरे रूप कळल्यामुळे तो उघडा पडला आणि पाथरुडकरांनी त्याला नारळ दिला. नंतर फिरत फिरत ठोकशाहीमध्ये टिकरला काम करू लागला पण काही दिवसातच नवशक्तीला गेला. 


नवशक्ती मध्ये संपादकीय  विभागात मोजून आठ कर्मचारी आणि एक रिपोर्टर ! कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झालेला. त्यामुळे कुणीही ऑफिसकडे फिरकेना. पाने कशी  लावावीत, याचे कोडे याला पडले आणि वाटी पत्रकाराने चक्क फ्री प्रेस जनरलचे इंग्रजी पान नवशक्तीमध्ये जसेच्या तसे छापले.वरून फुशारकी मारली, आता मराठी दैनिकात इंग्रजी पान वाचा... याचे इतके हसू झाले की सहाच महिन्यात मालकाने नवशक्तीमधून हाकलून लावले. 


मग हा वाटी पत्रकार ठोकशाहीच्या मालकाला कोटीच्या बिझिनेसचे गाजर दाखवून कार्यकारी संपादक पदावर बसला आहे. याला  इलेक्ट्रॉनिक तथा टीव्ही मीडियाचं "ओ " की "ठो" कळत नाही. या चॅनलमध्ये सध्या कुणी टिकत नाही. नवीन पोरं कुठं काम मिळत नाही म्हणून नाईलाजाने काम करताहेत ! वासरात  लंगडी गाय शहाणी प्रमाणे वाटी पत्रकार नवीन पोरावर रुबाब मारतोय. 


बेळगावच्या ठाकुरांची पीआरओशिप करताना, हा डुप्लिकेट ( जे कुठेच काम करीत नाहीत ) अश्याना घेऊन बिझिनेसच्या पत्रकार परिषदेला जात असे आणि त्यांना माझ्या मागे इतके पत्रकार आहेत म्हणून वेड्यात काढत असे.इतकेच काय तर ऑफिसकडे दिवसभर न फिरवता कुठं वाटी मिळते का ? हेच बघत असे.याने ठाकुरांना शेंडी कशी लावली,  हाकलून लावल्यानंतर तळवे चाटण्यासाठी बेळगावी मुक्कामी किती दिवस राहिला अश्या कितीतरी सुरस  कथा आहेत. 

इति वाटी पत्रकार पहिला अध्याय समाप्त !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या