वरकड यांचा राजीनामा, लांबे पुन्हा पुढारीत...


औरंगाबाद - दैनिक पुढारीच्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी एक वर्षाच्या आतच राजीनामा दिला आहे. वरकड यांनी राजीनामा देताच, धनंजय लांबे यांनी अवघ्या तीन महिन्यात लोकमतच्या शहर संपादक पदाचा राजीनामा देवून पुन्हा पुढारी जॉईन केले आहे. 


२० वर्षे सकाळमध्ये काम केल्यानंतर संजय वरकड यांनी १ मार्च रोजी पुढारी जॉईन केले होते,  ३१ डिसेंबर रोजी त्यांनी पुढारीचा राजीनामा दिला असून, एका टीव्ही चॅनलमध्ये जॉईन होणार असल्याची चर्चा आहे . 


दुसरीकडे वरकड यांनी राजीनामा देताच,  धनंजय लांबे यांनी अवघ्या तीन महिन्यात लोकमतच्या शहर संपादक पदाचा राजीनामा देवून पुन्हा पुढारी जॉईन केले आहे. लांबे यांनी यापूर्वी सामना, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाइम्स, पुढारी, लोकमत असा प्रवास करून पुन्हा पुढारी जॉईन केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या