नगर दिव्य मराठीत वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्या

व्यवस्थापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 


नगर - नगरच्या दिव्य मराठीत एक धक्कादायक घटना घडली आहे.  वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून एका  कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन  आत्महत्या केली आहे.याप्रकरणी मयत कर्मचाऱ्याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून व्यवस्थापक प्रमोद गवळी याच्यासह दोघांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला आहे. 


महेश वारंगुळे ( वय ३२ ) असे या मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगर दिव्य मराठीमध्ये काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यास व्यवस्थापक प्रमोद गवळी आणि संतोष लोहारकर यांनी वारंवार त्रास दिला, इतकेच काय तर खोटे रेकॉर्ड तयार करून कामावरून काढले. त्यामुळे निराश झालेल्या महेश वारंगुळे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 


मयत महेश वारंगुळे यांची पत्नी सविता वारंगुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिव्य मराठीचे व्यवस्थापक प्रमोद गवळी आणि संतोष लोहारकर  यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फियादीवरून भादंवि ३०६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या